शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या – आ. अनिल पाटील यांची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी; ना. अजित पवारांची घेतली भेट अमळनेर { अटकाव न्यूज } अवकाळी व सततच्या मुसळधार पावसामुळे अमळनेर विधानसभा मतदारसंघासह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, बळीराजाच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांनी मुंबई येथे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कृषिमंत्री तसेच मदत व पुनर्वसन मंत्री यांना तातडीने मदतीसाठी निवेदन दिले. आ. पाटील यांनी यासंदर्भात उपमुख्यमंत्री ना. अजित पवार आणि कृषिमंत्री दत्तामामा भरणे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन, तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी केली. ▪️शेतकऱ्यांचे नुकसान प्रचंड आ. पाटील यांनी सादर केलेल्या पत्रात नमूद केले आहे की, खरीप हंगामाच्या सुरुवातीला पावसाने मारलेली दडी, त्यानंतर झालेली अतिवृष्टी आणि अखंड कोसळणारा पाऊस यामुळे बळीराजाचा संपूर्ण हंगाम उद्ध्वस्त झाला आहे. सध्या