

अमळनेर (अटकाव न्यूज ) –
अमळनेर येथे नुकत्याच संपन्न झालेल्या शालेय क्रीडा स्पर्धा २०२५ मध्ये व्ही. झेड. पाटील हायस्कूल, शिरुडच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत तालुका स्तरावर अनेक क्रमांक पटकावले. विद्यार्थ्यांच्या खेळातील जिद्द, चिकाटी व कठोर परिश्रमामुळे विद्यालयाने क्रीडा क्षेत्रात आपले वर्चस्व सिद्ध केले.
विजेते विद्यार्थी व त्यांची कामगिरी :
- चि. भूषण सुरेश सुतार – 1500 मीटर धावणे (ता. ३ क्रमांक) 🥉
- चि. दर्शन शरद पाटील – 600 मीटर धावणे (ता. ३ क्रमांक) 🥉
- चि. दर्शन शरद पाटील – 800 मीटर धावणे (ता. २ क्रमांक) 🥈
- चि. लोकेश नितीन पाटील – गोळाफेक (ता. २ क्रमांक) 🥈
- चि. लोकेश नितीन पाटील – 200 मीटर धावणे (ता. २ क्रमांक) 🥈
- चि. किरण रवींद्र पाटील – 200 मीटर धावणे (ता. ३ क्रमांक) 🥉
- चि. साईल वसंत पाटील – लांब उडी (ता. २ क्रमांक) 🥈
- चि. कृष्णा हेमंत पाटील – ट्रिपल जंप (ता. २ क्रमांक) 🥈
- चि. जयेश सुनील पाटील – धावणे (ता. २ क्रमांक) 🥈
- चि. तेजस किशोर वैराडे –
- चि. मेघराज जितेंद्र पाटील –
- चि. चेतन हेमंत सोनवणे – (बॅडमिंटनमध्ये उपविजेते पद) 🏸
या सर्व विद्यार्थ्यांनी अमळनेर तालुक्यात शाळेचे नाव उंचावले असून त्यांच्या यशामुळे त्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
मान्यवरांचे अभिनंदन
या प्रसंगी मा. जि. प. सदस्य सौ. जयश्री अनिल पाटील ताई यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना भविष्यात अजून मोठ्या उंचीवर पोहोचण्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच श्रीमती पुष्पलता अशोक पाटील (स्थानिक स्कूल कमिटी चेअरमन), शालेय समिती, पालक-शिक्षक समिती, मुख्याध्यापक श्री. अनिल एस. सूर्यवंशी सर, क्रीडा प्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे शब्दसुमनांनी अभिनंदन करून त्यांचे स्वागत केले.
विद्यालयाच्या सर्व विद्यार्थ्यांनी केलेल्या या कामगिरीमुळे शिरुड गाव व संपूर्ण विद्यालय अभिमानाने गौरवले गेले आहे.
