
अमळनेर ( अटकाव न्यूज )सार्वजनिक श्रीराम नवमी उत्सव समितीची बैठक नुकतीच उत्साहात पार पडली. या बैठकीत यंदाच्या श्रीराम नवमी उत्सवानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
यावेळी भव्य रक्तदान शिबीर, पारंपारिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढण्यात येणार असून आदिवासी नृत्य सादरीकरण, लहान मुलांचे कला-कौशल्याचे कार्यक्रम तसेच वारकरी संप्रदायातील टाळ-मृदंगाच्या गजरात भजन-कीर्तन असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. त्यामुळे यंदाची श्रीराम नवमी मिरवणूक अधिक आकर्षक आणि उत्साहपूर्ण होणार असल्याचे समितीच्या सदस्यांनी सांगितले.
दरम्यान, दि. 26 मार्च 2026, गुरुवार रोजी होणाऱ्या या भव्य मिरवणुकीत व रक्तदान शिबिरात सर्व श्रीराम भक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन मिरवणुकीची शोभा वाढवावी, असे आवाहन सार्वजनिक श्रीराम नवमी उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.








