नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने DL SOCIAL FOUNDATIONचा अनोखा उपक्रम; जळगाव जिल्ह्यातील कर्तृत्ववान महिलांच्या नामनिर्देशनाला सुरुवात

अंमळनेर अटकाव न्यूज :
नवरात्र म्हणजे शक्तीची आराधना आणि नारीशक्तीचा गौरव! याच भावनेला साजेसे पाऊल उचलत DL SOCIAL FOUNDATIONच्या वतीने जळगाव जिल्ह्यातील विविध क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या महिलांचा ‘नारी शक्ती ग्राम गौरव सन्मान सोहळा–२०२६’ आयोजित करण्यात येणार आहे.
‘गावच्या लेकींचा सन्मान, गावाच्या प्रगतीचा अभिमान!’ या प्रेरणादायी संकल्पनेतून आयोजित करण्यात येणाऱ्या या विशेष उपक्रमाद्वारे समाजासाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या महिलांच्या कार्याला व्यासपीठ देऊन त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.
कर्तृत्व कुठल्याही क्षेत्रातील असो… सन्मान नारीशक्तीचा!
शिक्षण, आरोग्य, शेती, उद्योग-व्यवसाय, स्वयंरोजगार, सामाजिक कार्य, क्रीडा, कला-संस्कृती, ग्रामविकास, पर्यावरण यांसह विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा या सन्मानासाठी विचार करण्यात येणार आहे. तसेच प्रतिकूल परिस्थितीवर मात करून स्वतःच्या जिद्द, मेहनत आणि संघर्षातून यशाचा नवा आदर्श निर्माण करणाऱ्या महिलांनाही सन्मानासाठी प्राधान्य दिले जाणार आहे.
आपल्या गावातील ‘नारी शक्ती’ला द्या सन्मानाचे व्यासपीठ!
जळगाव जिल्ह्यातील कर्तृत्ववान महिलांच्या नामनिर्देशनासाठी प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. आपल्या गावात, परिसरात किंवा समाजात उल्लेखनीय कार्य करणारी महिला आपल्या परिचयाची असल्यास तिचे नामनिर्देशन नागरिकांना करता येणार आहे.
प्राप्त प्रस्तावांमधील माहिती व संबंधित महिलेच्या कार्याची पडताळणी करून संस्थेच्या निर्धारित निकषांनुसार ‘नारी शक्ती ग्राम गौरव’ सन्मानासाठी महिलांची निवड करण्यात येणार आहे.
कुटुंबाची जबाबदारी सांभाळत समाजासाठी योगदान देणाऱ्या, गावाच्या विकासात सक्रिय सहभाग घेणाऱ्या, संघर्षावर मात करून यश संपादन करणाऱ्या आणि इतर महिलांसाठी प्रेरणास्थान ठरणाऱ्या ‘गावच्या लेकींचे’ कर्तृत्व समाजासमोर यावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
जळगाव जिल्ह्यातील नागरिकांनी आपल्या परिसरातील कर्तृत्ववान महिलांची माहिती पुढे आणून या प्रेरणादायी उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन DL SOCIAL FOUNDATIONचे संचालक डॉ. समाधान मैराळे व संचालिका सौ. भावना समाधान मैराळे यांनी केले आहे.
“नारीशक्तीचा सन्मान… समाजाच्या प्रगतीचा अभिमान!”
“कर्तृत्वाला सलाम, नारीशक्तीला मान!”
DL SOCIAL FOUNDATION
“समाजासाठी समर्पित”
संपर्क : 7796112894
डॉ. समाधान मैराळे — संचालक
सौ. भावना समाधान मैराळे — संचालिका








