
अमळनेर (अटकाव न्यूज ) :– समाजात एचआयव्ही/एड्स सह जगणाऱ्या अनाथ मुलांचे जीवनमान उंचावण्यासाठी रोटरी क्लब, अमळनेर सातत्याने कार्यरत आहे. मागील सात वर्षांपासून रोटरी क्लबने आधार बहुउद्देशीय संस्थेसोबत मिळून या मुलांसाठी वैद्यकीय व सामाजिक आधार उपक्रम हाती घेतले आहेत.
दि. १९ ऑगस्ट २०२५ रोजी रोटरी हॉल येथे प्रोटीन टिन वाटप सोहळा पार पडला. हा उपक्रम रो. विनोद भैय्या पाटील यांच्या परिवाराकडून आयोजित करण्यात आला होता. त्यांच्या शुभहस्ते मुलांना किटचे वितरण करण्यात आले. या उपक्रमाचा उद्देश फक्त पौष्टिक आहार पुरवणे एवढाच नव्हे, तर समाजाने या मुलांना स्वीकारले आहे, हा आत्मविश्वास देणे हा होता.
या कार्यक्रमाला रोटरी क्लबचे अध्यक्ष रो. देवेंद्र कोठारी, सचिव रो. आशिष चौधरी यांच्यासह जेष्ठ सदस्य विवेक देशमुख, पूनम कोचर, प्रतीक जैन, किशोर लुल्ला, वृषभ पारेख, रोहित सिंघवी, तहा बूकवाला, अहमदी बोहरी, महेश पाटील, डॉ. दिलीप भावसार, चैलाराम सेनानी व ईश्वर सेनानी आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आधार बहुउद्देशीय संस्थेच्या डॉ. भारती पाटील, रेणु प्रसाद, संजय कापडे (कार्यक्रम समन्वयक), राकेश महाजन, अश्विनी सुर्यवंशी, पुनम पाटील, तौसिफ शेख व विक्की सिरसाठ यांनी मोलाचे सहकार्य केले.
मान्यवरांनी आपल्या मनोगतात सांगितले की – एचआयव्ही सह जगणाऱ्या मुलांना फक्त वैद्यकीय मदतीचीच नाही तर सामाजिक स्वीकृती व मानसिक आधाराचीही गरज आहे. समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवणे ही काळाची गरज आहे.
रोटरी क्लब, अमळनेर सामाजिक बांधिलकी जपत अशा उपक्रमांत नेहमीच अग्रणी राहील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
विशेष आभार :
रो. विनोद भैय्या पाटील व परिवार
रोटरी क्लब, अमळनेर 🙏
