अमळनेरकरांना मोठी भेट : तिरुपती-हिसार (खाटू श्याम) एक्सप्रेसचा थांबा सुरू

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

खासदार स्मिता वाघ यांच्या प्रयत्नांमुळे मिळाला हा थांबा

अमळनेर 🙁 अटकाव न्यूज ):-
उत्तर महाराष्ट्रातील प्रवासी व भाविकांसाठी दिलासादायक ठरणारी आनंदवार्ता म्हणजे तिरुपती-हिसार (खाटू श्याम) एक्सप्रेसला अखेर अमळनेर स्थानकावर अधिकृत थांबा मिळाला आहे. खासदार स्मिताताई वाघ यांच्या सततच्या पाठपुराव्यानंतर हा निर्णय घेण्यात आला असून, आज या गाडीचा अमळनेर येथे पहिला थांबा घेण्यात आला.

गाडी थांबताच अमळनेर रेल्वे स्टेशनवर प्रवाशांनी जल्लोषात स्वागत केले. हिरवा झेंडा दाखवून गाडीला मार्गस्थ करण्यात आले. या सोहळ्याला डॉ. अनिल शिंदे, शहर मंडल अध्यक्ष योगेश महाजन, ग्रामीण मंडल अध्यक्ष राहुल पाटील, लालचंद सैनानी, हरचंद लांडगे, नीरज अग्रवाल, श्याम पाटील, प्रीतपालसिंग बग्गा, सरचिटणीस भरतसिंह परदेशी, महेश पाटील, सुभाष मामा, महेश संदनशिव तसेच स्टेशन मास्टर अनिल जी. शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

खासदार स्मिता वाघ यांच्या प्रयत्नांमुळे मिळालेला हा थांबा अमळनेर शहर व परिसरातील नागरिकांसाठी मोठी सोय ठरणार आहे. खाटू श्याम बाबाच्या दर्शनासाठी तसेच तिरुपतीकडे जाणाऱ्या भाविकांसाठी ही सुविधा वरदान ठरेल. या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत असून, उपस्थित भाविक व प्रवाशांनी खासदार स्मिताताईंचे मनःपूर्वक आभार मानले.

Atkav News
Author: Atkav News

Leave a Comment

और पढ़ें