
जवखेडे, दि. 30 ऑगस्ट:- अटकाव न्यूज
अमळनेर तालुक्यातील जवखेडे येथील प्रा. कुणाल राजेंद्र पाटील, एकता मित्र मंडळ व समस्त यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
शिबिराची सुरुवात सकाळी ८ वाजता ज्ञानवर्धिनी अभ्यासिकेत झाली. “रक्तदान हेच जीवनदान” या उदात्त हेतूने शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी रावसो निवृत्ती संतोष पाटील, नानासो प्रभाकर ताराचंद पाटील, श्यामकांत गोपीचंद पाटील, राजेंद्र गुलाबराव पाटील, डॉ. दीपक पाटील मांडल, भिकन नफ्फर पाटील, भिकन गजमल पाटील, मनोज आत्माराम पाटील, नेताजी वसंतराव पाटील, प्रशांत पुरुषोत्तम पाटील, मयूर चंद्रभान पाटील, अनिल शांताराम पाटील, चुडामन प्रकाश पाटील, सुनील गुलाब पाटील, दिलीप फकीर पाटील, दिनेश नानागिर गोसावी, रामभाऊ आनंदा पाटील, प्रमोद अशोक पाटील, सुरेश पुना पाटील, श्रीराम शालीक पाटील तसेच गणेश उत्सव मंडळातील सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या शिबिरात एकूण ५० बाटल्या रक्त संकलित करण्यात आले व ते जीवनश्री रक्ताकेंद्राला सुपूर्द करण्यात आले. रक्तदात्यांना प्रोत्साहन म्हणून प्रमाणपत्र तसेच २० लिटर पाण्याचा जार प्रा. कुणाल राजेंद्र पाटील यांच्या सौजन्याने भेट देण्यात आला.
अशा उपक्रमांमुळे समाजात रक्तदानाचे महत्त्व अधिक अधोरेखित होऊन अनेक गरजू रुग्णांचे प्राण वाचतील, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.
