अमळनेर पोलीसांकडून मॉक ड्रिल व रूट मार्च – कायदा व सुव्यवस्था सुरळीत ठेवण्याचा निर्धार

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

अमळनेर (अटकाव न्यूज ) :
आगामी गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद या महत्त्वाच्या सणांच्या पार्श्वभूमीवर अमळनेर उपविभागीय पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे. शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखावी तसेच कोणत्याही प्रकारच्या अनुचित घटनांना आळा घालावा या उद्देशाने आज दिनांक २८ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ९.४५ ते ११.४५ या वेळेत अमळनेर पोलीस स्टेशन तर्फे मॉक ड्रिल (दंगा काबू योजना सराव) व रूट मार्चचे आयोजन करण्यात आले.

हा सराव जळगाव येथील पोलीस मुख्यालयातील कवायत निर्देशक यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मा. श्री. विनायक कोते (उपविभागीय पोलीस अधिकारी, सो. अमळनेर भाग) व श्री. दत्तात्रय निकम (पोलीस निरीक्षक, अमळनेर पोलीस स्टेशन) यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, गांधलीपुरा परिसरात दंगल नियंत्रणाची संपूर्ण प्रत्यक्ष प्रात्यक्षिके दाखविण्यात आली. यात ढाल, लाठी, गॅसगन, शिल्ड, ग्रेनेड यांचा वापर करून अंमलदारांना प्रशिक्षण देण्यात आले. अधिकारी व जवानांना प्रत्यक्ष कार्यवाहीची माहिती तसेच मार्गदर्शन करण्यात आले.

यानंतर शहरातील संवेदनशील भागांमधून रूट मार्च काढण्यात आला. यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, सुभाष चौक, बाजारपेठ, तिरंगा चौक, कुंटे रोड, पवन चौक, झामी चौक, आखाडा मकान, कसाली डीपी, जामा मशीद, सराफ बाजार, दगडी दरवाजा, गुळ बाजार, गांधलीपुरा चौकी आदी भागांचा समावेश होता.

या रूट मार्चमध्ये अमळनेर, मारवड, पारोळा, एरंडोल पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार तसेच पोलीस मुख्यालय जळगाव येथील दंगा नियंत्रण पथक, स्ट्रायकिंग फोर्स व होमगार्ड सहभागी झाले.

  • अमळनेर पोलीस स्टेशन : ०४ अधिकारी, ३६ अंमलदार
  • मारवड पोलीस स्टेशन : ०१ अधिकारी, ११ अंमलदार
  • पारोळा पोलीस स्टेशन : १० अंमलदार
  • एरंडोल पोलीस स्टेशन : ०७ अंमलदार
  • दंगा नियंत्रण पथक : ०१ पथक
  • स्ट्रायकिंग फोर्स : ०१ पथक
  • होमगार्ड : ६२ जवान

या सराव आणि रूट मार्चमुळे नागरिकांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला असून पोलीस प्रशासनाच्या सज्जतेबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दल नेहमी तत्पर असल्याचा स्पष्ट संदेश “हैं तैयार हम” या घोषवाक्यातून देण्यात आला.

Atkav News
Author: Atkav News

Leave a Comment

और पढ़ें