नूतन मांडळ विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाची बिनविरोध निवड

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

अमळनेर – तालुक्यातील मांडळ विविध कार्यकारी सहकारी सोसायटी मर्यादित, मांडळ येथे चेअरमन व व्हाईस चेअरमन निवडणूक उत्साहात पार पडली. दि. 16 ऑगस्ट 2025, शनिवारी दुपारी बारा वाजता झालेल्या या निवडणुकीत चेअरमन पदासाठी श्री. नामदेव पोपट बडगुजर यांची तर व्हाईस चेअरमन पदासाठी श्री. रवींद्र रावण पाटील यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली.

या निवडणुकीवेळी सोसायटीचे संचालक मंडळातील सदस्य श्री. देविदास पुना कोळी, सौ. ललिता विलास सोनवणे, इंदुबाई यशवंत पाटील, शालिग्राम नथू बडगुजर, सुंदरबाई धोंडू कोडी, दिगंबर हिंमत मराठे, सुभाष माधवराव पाटील, शेख फारुक शेख रज्जाक, सुरेश दगा धनगर, सोमनाथ नारायण खैरनार, रवींद्र हिम्मत पाटील, सचिव प्रदीप कौतिक पाटील (शिपाई) आदी मान्यवर उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री. सुनील महाजन (सहकार अधिकारी) व सचिव रवींद्र हिम्मत पाटील यांनी काम पाहिले.

निवडीनंतर नव्या चेअरमन व व्हाईस चेअरमन यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.

या प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक डॉ. अशोक पाटील, माजी पंचायत समिती सभापती डॉ. दीपक पंढरीनाथ पाटील, माजी सरपंच विनायक बडगुजर, सरपंच दीपक बडगुजर विजय पाटील, मनोहर पाटील, रतिलाल पाटील, शिवसेना नेते बाळासाहेब पवार, भारतीय जनता पार्टी नेते अनिल जैन, राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते स्वप्निल पाटील, वासू मामा सोसायटीचे माजी चेअरमन वसंत दासबो, भानुदास पाटील, संदीप सर शिरसाट, रावसाहेब शिरसाट, पैलवान उमेश हिरामण मगरे, माजी उपसरपंच सिताराम शिरसाट, पांडू भिल, पोलीस पाटील सुरेश सर, हेमंत पाटील, भैय्यासाहेब पाटील, चेतन पाटील, मंगलदास कांबळे, माजी पोलीस पाटील भास्कर पाटील, माजी चेअरमन संजय पेंढारकर, नाना नवल धनगर, चंद्रकांत भिल आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ग्रामस्थांनी व मान्यवरांनी नव्याने निवडून आलेल्या चेअरमन नामदेव बडगुजर व व्हाईस चेअरमन रवींद्र पाटील यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.

बातमीमध्ये मांडळ गावाचे यांचे नाव सुटले आहे ते समावेश करून ही नम्र विनंती

Atkav News
Author: Atkav News

Leave a Comment

और पढ़ें