अमळनेर : स्वातंत्र्य दिनी ‘प्रधान मंत्री आवास योजना’ घरकुलांचे आमदारांच्या हस्ते उद्घाटन

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

अमळनेर (अटकाव न्यूज) –
१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून अमळनेर शहरातील प्रधान मंत्री आवास योजनेअंतर्गत बांधकाम पूर्ण झालेल्या घरकुलांचे उद्घाटन आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार पाटील यांनी हेडावे रोडवरील लाभार्थी श्री. बारकु गिरधर पाटील, सौ. सुरेखा गोपाल चौधरी व श्री. अनिल भोई यांच्या गृहप्रवेश सोहळ्याचे फित कापून व श्रीफळ वाहून शुभारंभ केला.

मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमासाठी मा. उपविभागीय अधिकारी नितीन मुंडावरे, मुख्याधिकारी तुषार नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते, तहसिलदार रुपेशकुमार सुराणा, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, अमळनेर नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी रविंद्र चव्हाण, नगर अभियंता सुनिल पाटील, डिगांबर वाघ, अजित लांडे, नगररचना सहाय्यक मयुर तोंडे, सौरभ बागड, लेखापाल सुदर्शनराज शामनानी, कृणाल कोष्टी, विद्युत अभियंता कुणाल महाले, प्रधान मंत्री आवास योजना अभियंता धिरज पाटील तसेच नगरपरिषदेचे कर्मचारी उपस्थित होते.

लाभार्थ्यांच्या तक्रारीवर तात्काळ प्रतिसाद
सदर लाभार्थ्यांनी कार्यक्रमादरम्यान महावितरण संदर्भात तक्रार मांडली असता, आमदार पाटील यांनी त्वरित महावितरण अभियंत्यांना दूरध्वनीद्वारे संपर्क साधून संबंधित तक्रारींचे निराकरण करण्याचे स्पष्ट निर्देश दिले.

नगरपरिषदेच्या कार्याची प्रशंसा
नाशिक विभागात वैयक्तिक घरकुल पूर्ण करण्यात अमळनेर नगरपरिषद प्रथम क्रमांकावर असल्याचे अधोरेखित करत आमदार पाटील यांनी नगरपरिषदेच्या कामगिरीचे विशेष कौतुक केले. तसेच, गरजूंना घरकुल पुरविण्याच्या कामात पारदर्शकता आणि गती ठेवण्याचा सल्लाही दिला.

Atkav News
Author: Atkav News

Leave a Comment

और पढ़ें