

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जळगाव व गट शिक्षण अधिकारी पारोळा यांच्या मार्गदर्शनाने पारोळा तालुक्यातील प्रत्येक केंद्रात जुलै 2025 या महिण्यातील प्रथम शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले. या आंतर्गत भिलाली केंद्रातील शिक्षण परिषदेचे प्रथम पुष्प गुंफण्याचा मान श्री संत सोमगिर माध्यमिक विद्यालय भिलाली, जिल्हा परिषद केंद्र शाळा भिलाली व जिल्हा परिषद शाळा हिवरखेडे बु. तालुका पारोळा, जिल्हा जळगाव.यांच्या संयुक्त विद्यमाने श्री संत सोमगिर माध्यमिक विद्यालय भिलाली ता. पारोळा यांना मिळाला.
कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवनाने झाली. भिलाली केंद्राचे केंद्रप्रमुख यशवंतराव शिंदे यांच्या शुभहस्ते सरस्वतीच्या फोटोला माल्यर्पण व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माध्य. विद्यालयाचे मुख्या. श्री अविनाश पाटील हे होते. याप्रसंगी मंचावर देविदास पाटील, कैलास माळी, आत्माराम चौधरी, मनीष शिंदे, राजेंद्र मोरे, मीना पाटील मॅडम ,पूनम साळुंखे मॅडम ,अनिल चौधरी इत्यादी उपस्थित होते
शिक्षण परिषदेत केंद्रातर्गत उपस्थित केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक इत्यादींनी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जळगाव यांनी दिलेल्या नियोजनाप्रमाणे विद्यार्थी हिताशी निगडित व शाळेशी निगडित अनेक प्रश्नांवर सखोल चर्चा करून शिक्षण परिषदेचे कामकाज पूर्ण केले.
कार्यक्रमाला श्री स्वामी समर्थ शैक्षणिक व सांस्कृतीक मंडळ भादली खुर्द संस्थेचे अध्यक्ष आण्णासाहेब मनोज पाटील सर यांच्या शुभेच्छा लाभल्यात. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल जाधव, प्रास्ताविक सुनील वाणी, तर आभार प्रदर्शन विकास पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दगडू पाटील, ईश्वर धोबी, अरविंद साळुंखे, कविता वाघ, उमा वानखेडे ,भाग्यश्री पाटील , कविता वाघ,रूपाली पाटील, सुरेश पाटील ,हरेश्वर पाटील ,वाल्मीक पाटील, गुणवंत साळुंखे, रवींद्र मोरे, आस्तिक पाटील ,रोहित साळुंखे, अमोल जोगी, अरुण पाटील, रंगराव पाटील, योगेश पाटील, अविनाश भिल यांनी परिश्रम घेतले.









