होमगार्ड यास मारहाण प्रकरणी आरोपीस तीन महिन्यांची सक्तमजुरीची शिक्षा

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

अमळनेर, दि. २ ऑगस्ट २०२५:
होमगार्ड यास मारहाण केल्याच्या प्रकरणात अमळनेर येथील आरोपी इस्माईल जाकूर पठाण उर्फ इस्माईल खट्टा (वय २९, रा. पानखिडकी जिनगर गल्ली, अमळनेर) याला तीन महिन्यांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

हा खटला अमळनेर पोलीस स्टेशन गु.र.नं. 663/2020, सेशन केस क्र. 08/2021 अंतर्गत दाखल होता. यामध्ये आरोपीने गावातील अल्पवयीन मुलीची छेड काढल्याच्या संशयावरून होमगार्ड यास, जो की सरकारी कर्तव्य बजावत होता, त्याच्यावर थेट हात उगारले आणि शिवीगाळ व मारहाण केली. सदर प्रकारामध्ये पो.हे.कॉ. ललित पाटील यांनी वेळेवर हस्तक्षेप करून आरोपीस पकडले होते.

या प्रकरणात साक्षीदारांच्या साक्षी व पुराव्यांच्या आधारे आरोपीस भारतीय दंड विधान कलम 353, 332, 504 नुसार दोषी ठरवण्यात आले. न्यायालयीन सुनावणीदरम्यान, न्यायाधीश मा. तदर्थ व अति. जिल्हा न्यायाधीश 2 श्री. एल. डी. गायकवाड यांच्या अध्यक्षतेखालील न्यायालयाने सरकारी वकील अॅड. के. आर. बागुल यांच्या युक्तिवादावर शिक्कामोर्तब करत आरोपीस शिक्षा ठोठावली.

अभियोजन पक्षातर्फे एकूण ६ साक्षीदार तपासण्यात आले. साक्षी व तक्रारदार यांच्या ठोस साक्षांवरून आरोपीस दोषी ठरवून कलम 332 अंतर्गत ३ महिन्यांची सक्तमजुरी व 2000/- रुपयांचा दंड तसेच इतर कलमांखाली प्रत्येकी 1000/- रुपयांचा दंड सुनावण्यात आला.

या प्रकरणात अमळनेर पोलीस स्टेशनचे स्टे. बंच व पेरी अधिकारी, पो.हे.कॉ. पुरुषोत्तम वाघ, पो.एस.आय. उदयसिंग सांळुके, पो.कॉ. राहुल रणधीर (चोपडा ग्रामीण), पो.हे.कॉ. प्रमोद पाटील (चोपडा शहर), पो.कॉ. भारत ईशी (मारवड), पो.कॉ. सतीश अडावद यांनी तपासात मोलाचे सहकार्य केले.

सरकारी पक्षातर्फे अति. सरकारी वकील अॅड. के. आर. बागुल यांनी काम पाहिले.

Atkav News
Author: Atkav News

Leave a Comment

और पढ़ें