मोफत पाठ्यपुस्तक वाटपाने विद्यार्थ्यांचे स्वागत, शाळा प्रवेशोत्सवात पालकांची मोठी उपस्थिती

अमळनेर ( अटकाव न्यूज ) :
खा.शी. मंडळ संचलित श्रीमती द्रौ.रा. कन्या शाळेमध्ये महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागांतर्गत शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रवेशोत्सवाच्या औचित्याने नवागत विद्यार्थिनींचा सत्कार व मोफत पाठ्यपुस्तक वाटप सोहळा नुकताच संपन्न झाला.
यावेळी जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या खासदार मा. सौ. स्मिता वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थिनींना शालेय जीवनाच्या पहिल्या दिवसाचे औचित्य साधून हारतुरे घालून आणि फुलांचा वर्षाव करून स्वागत करण्यात आले. यावेळी पालकांसह शाळेच्या प्रांगणात मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून गटशिक्षणाधिकारी रावसाहेब मांगो पाटील, शाळा समितीचे चेअरमन निरज अग्रवाल, संचालक हरी अण्णा वाणी, योगेश मुंदडे, प्रदीप अग्रवाल, डॉ. संदेश गुजराथी यांनीही आपली उपस्थिती दर्शवली.
कार्यक्रमाचे संचालन श्रीमती एस.एस. देवरे यांनी तर आभारप्रदर्शन शाळेच्या मुख्याध्यापिका एस.एस. सूर्यवंशी यांनी केले. यावेळी पर्यवेक्षिका एस.पी. बाविस्कर, राणे प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका भारती आठवले, जी.एस. हायस्कूलचे मुख्याध्यापक व्ही.एम. कदम, ज्येष्ठ शिक्षक एस.एस. माळी, करुणा शिक्षक डी.एन. पालवे हे मान्यवरही कार्यक्रमास उपस्थित होते.
खासदार स्मिता वाघ यांनी विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक योजना अंतर्गत पुस्तकांचे वितरण केले आणि त्यांच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. आपल्या भाषणात त्यांनी शालेय शिक्षणाच्या सुरुवातीस मुलींना योग्य मार्गदर्शन मिळणे किती आवश्यक आहे, यावर भर दिला. त्यांनी शाळेतील शिक्षकवृंद आणि पालकांचे अभिनंदन करत शैक्षणिक प्रगतीसाठी सहकार्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. संपूर्ण वातावरण आनंदी व उत्साहवर्धक होते. नव्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थिनींसाठी हा दिवस आयुष्यभर स्मरणात राहणारा ठरला.









