
अमळनेर (अटकाव न्यूज ) :–
अमळनेर शहरातील न्यू अशोक दादा भालेराव नगर (गट नं. 1390/2 अ) वेदप्रिय अपार्टमेंट पासून श्याम बापू अहिरे यांच्या घरापर्यंत धुळे रोडला जोडणारा हा मुख्य रस्ता आज अक्षरशः झाडाझुडपांच्या विळख्यात, गाऱ्याच्या खोल डबक्यात बुडालेला आहे. हा रस्ता परिसरातील नागरिकांचा मुख्य मार्ग असूनही नगरपरिषदेने याकडे संपूर्ण दुर्लक्ष केलेले आहे.
👉 नागरिकांना पायी चालणे देखील मुश्किल झाले असून, रोजच्या वाहतुकीला प्रचंड अडथळा निर्माण होत आहे. रस्ता इतका खराब झालेला आहे की वाहनचालकांसह पादचारी देखील जिव मुठीत धरून प्रवास करत आहेत.
👉 “किमान मुरूम टाकून रस्ता मोकळा करावा” अशी मागणी नागरिक वारंवार करत असले तरी नगरपरिषदेच्या उदासीनतेमुळे संताप वाढत चालला आहे.
👉 नुकतेच भालेराव नगरात डेंगूचे पेशंट निघाले असून, परिसरात गवत व घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. तरीदेखील नगरपरिषदेने तणनाशक व मच्छरनाशक फवारणीसुद्धा केलेली नाही.
नागरिकांचे म्हणणे –
- “नगरपरिषदेने तात्काळ लक्ष दिले नाही, तर आम्हाला मोर्चा काढावा लागेल.”
- “भालेराव नगरातील समस्या वर्षानुवर्षे प्रलंबित असून, अधिकारी फक्त आश्वासनावर नागरिकांना फिरवतात.”
- “शहरात स्वच्छता अभियानाचे फलक लावतात पण वस्तुस्थिती मात्र भीषण आहे.”

📌 नागरिकांचा ठाम इशारा –
जर तात्काळ भालेराव नगरात मुरूम टाकून रस्ता मोकळा केला नाही व स्वच्छतेची उपाययोजना केली नाही, तर परिसरातील नागरिक मोर्चा काढून नगरपरिषदेवर धडक देणार आहेत.
➡️ म्हणूनच, मुख्याधिकारी साहेब व संबंधित विभागाने तात्काळ भालेराव नगरात रस्ता दुरुस्ती, झुडपे व गवत कापणी, तसेच डास-तणनाशक फवारणी करण्याची गरज आहे.
