अमळनेर जैन स्थानकात चातुर्मास व पर्युषण पर्व धार्मिक उत्साहात सुरू

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

अमळनेर (अटकाव न्यूज ) :
अमळनेर येथील जैन स्थानकात आचार्य प्रवर प्रकाश मुनीजी महाराज साहेब यांचे सुशीष्य सुमती मुनीजी महाराज साहेब यांच्या सान्निध्यात यावर्षीचा चातुर्मास व सध्या सुरू असलेला जैन समाजाचा सर्वात मोठा धार्मिक सण पर्युषण पर्व अत्यंत श्रद्धा, भक्ती व उत्साहाच्या वातावरणात पार पडत आहे.

यावर्षीच्या चातुर्मास प्रसंगी ज्ञान गच्छाधिपती 1008 श्री प्रकाश मुनीजी महाराज यांचे सुशीष्य सुमती मुनीजी महाराज साहेब आदि ठाणा-३ तसेच महासतीजी सुनिताजी आदि ठाणा-३ यांच्या पावन सान्निध्यात धर्म आराधना, तप आराधना आणि विविध धार्मिक विधी उत्साहात पार पडत आहेत.

🕉️ दररोजची धार्मिक दिनचर्या

  • सकाळी ६:३० वाजता महावीर क्लास (५० ते ५५ श्रावक उपस्थित)
  • सकाळी ८:३० ते ९:१५ अंतगड सूत्र वाचन
  • सकाळी ९:१५ ते १०:३० प्रवचन
  • दुपारी २:०० वाजता धार्मिक चर्चा
  • संध्याकाळी ६:४५ प्रतिक्रमण
  • रात्री ८:१५ धार्मिक चर्चा व स्तवन

या धार्मिक उपक्रमांमध्ये रोज ३५० ते ४०० भाविक बंधूभगिनी, नवयुवक व बालगोपाल उपस्थित राहून प्रवचन व धर्मगतींचा लाभ घेत आहेत.

🙏 तप आराधना व उपवास
चातुर्मास व पर्युषण पर्वामध्ये विविध प्रकारच्या तप-आराधना होत आहेत. यात उपवास, तेले, ५, ८, ९, ११, १५ उपवास, तसेच नवरंगी, ११ रंगी आदी तपांचा समावेश आहे. भाविक मोठ्या श्रद्धेने व निष्ठेने यात सहभागी होत आहेत.

🌼 प्रवचन शैली व मार्गदर्शन
सुमती मुनीजी महाराज साहेबांची प्रवचन शैली अत्यंत सोप्या व सरळ भाषेत असून आजच्या धर्तीवर उदाहरणांसह भगवान महावीर स्वामींच्या शिकवणीचे मर्म समजावून सांगितले जाते. त्यामुळे सर्व वयोगटातील भाविक वर्ग त्याचा लाभ घेत आहे.

स्थानकात रात्री संवरसाठी ३० ते ४० बंधू सहभागी होतात, तर ज्या ठिकाणी महासतीजी विराजमान आहेत, त्या ठिकाणी ४० ते ५० श्राविका संवर विधी पार पाडत आहेत.

📖 धार्मिक अध्ययनाची नवी दिशा
चातुर्मासाच्या निमित्ताने जैन धर्मातील आगम ज्ञान, धर्मशिक्षण व धार्मिक अध्ययनावर विशेष भर देण्यात येत असून, अमळनेर नगरीत धर्म आराधना उत्कृष्ट पद्धतीने सुरू आहे.

Atkav News
Author: Atkav News

Leave a Comment

और पढ़ें