भिलाली येथील माध्यमिक विद्यालयात झाडाला मानवी राखी बांधून रक्षाबंधन केले साजरे

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

पारोळा- श्री स्वामी समर्थ शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळ भादली खुर्द ता.जि. जळगांव संचलित श्री संत सोमगीर माध्यमिक विद्यालय भिलाली, ता. पारोळा येथे वृक्षाला विद्यार्थ्यांची मानवी राखी बांधून रक्षाबंधन साजरे करण्याते आले. वृक्ष जे सगळ्या प्राणीमात्रांना निस्वार्थ, ऑक्सिजन, सावली, फळे, फुले, लाकूड इ. देत राहतात व त्याहीपेक्षा जास्त महत्वाचे म्हणजे सजीव सृष्टीचे श्रृजनच वृक्षांच्या योगदानने होते. याचे भान ठेवूनच रक्षाबंधन साजरे करण्यात आले.

सध्याच्या युगात होत असलेली अमानुष वृक्षतोड पाहता प्रत्येक सरकारी व निम सरकारी कार्यालयात एक पेड मा के नाम या उपक्रमात अनेक ठिकाणी वृक्ष लागवड केली आहे. पण जे झाड अगोदरपासूनच आहे त्याला सांभाळणे ही आपली व नवीन पिढीची जबाबदारी आहे.

हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून शाळेचे उपशिक्षक विशाल जाधव यांच्या संकल्पनेतून आणि वाल्मीक पाटील,विकास पाटील,रवींद्र मोरे,भाग्यश्री पाटील, रूपाली पाटील, अविनाश भिल,यांच्या सहकार्याने संस्थेचे अध्यक्ष मनोज पाटील व शाळेचे मुख्याध्यापक अविनाश पाटील यांच्या मार्गदर्शनाने शाळेत रक्षाबंधनाचा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमासाठी सुरेश पाटील,हरेश्वर पाटील, गुणवंत साळुंखे ,आस्तिक पाटील अरुण पाटील, योगेश पाटील ,रंगराव पाटील इत्यादींनी परिश्रम घेतले.

Atkav News
Author: Atkav News

Leave a Comment

और पढ़ें