
अमळनेर: नवीन माध्यमिक विद्यालय अंतुर्ली-रंजाने येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक १० जुलै २०२५ रोजी नवीन माध्यमिक विद्यालय, अंतुर्ली-रंजाने तालुका अमळनेर जिल्हा जळगाव येथे वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
संस्थेच्या अध्यक्षा सौ. तिलोत्तमा रवींद्र पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी संस्थेचे सचिव रवींद्र बापू पाटील, मुख्याध्यापक राजेंद्र पाटील, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपस्थित मान्यवर:
श्री. आर. बी. पाटील, श्री. एस. ए. पाटील, एम. आर. पाटील मॅडम, श्रीमती एस. जी. बैसाणे, श्री. जी. बी. पाटील, लिपिक एस. बी. पाटील, भगवान भाऊ, संजू भाऊ, नानाभाऊ, श्रीमती वैशाली पाटील, श्री. एम. एच. चव्हाण, श्री. ए. एन. पाटील आदी मान्यवरांनी कार्यक्रमात सहभाग घेतला.
पर्यावरणविषयी जागरूकता:
या उपक्रमात विद्यार्थ्यांना वृक्षलागवडीचा प्रत्यक्ष अनुभव देण्यात आला. त्यामुळे त्यांच्यात निसर्गप्रेम आणि पर्यावरण स्नेही दृष्टिकोन विकसित होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन एम. आर. पाटील मॅडम यांनी तर आभारप्रदर्शन बैसाणे मॅडम यांनी केले.
सुनील तटकरे साहेबांचा वाढदिवस पर्यावरण पूरक उपक्रमाने साजरा केल्याबद्दल ग्रामस्थ व पालकवर्गातून कौतुकाची भावना व्यक्त होत आहे.









