
अमळनेर (अटकाव न्यूज ) – निम्मं तापी प्रकल्पासह पाडळसरे धरणाला ऐतिहासिक गती देणारे, राज्याचे माजी मंत्री व आमदार अनिलदादा पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात येत आहे. जनतेच्या मनात स्थान मिळवलेल्या या लोकप्रिय आमदाराच्या वाढदिवसानिमित्त कृषी उत्पन्न बाजार समिती, अमळनेर यांच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
शेती, शेतकरी आणि ग्रामीण विकासासाठी कार्यरत असणाऱ्या आ. अनिलदादा पाटील यांनी आपल्या अभ्यासू, कार्यक्षम व दूरदृष्टी असलेल्या नेतृत्वामुळे अमळनेर मतदारसंघात अनेक विकासकामांची मुहूर्तमेढ रोवली आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत शेतकऱ्यांसाठी “बेल्ट माप वाटप”, बाजार समितीतील मापाडींसाठी वैद्यकीय लॉकर सुविधा आणि शैक्षणिक साहित्य वाटप यासारख्या उपक्रमांची सुरुवात करण्यात आली आहे.
या कार्यक्रमात विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. याचा लाभ अनेक गरजू विद्यार्थ्यांना होणार आहे. बाजार समितीतील मापाडी व हमालांसाठी वैद्यकीय सुविधा देऊन सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न समितीने केला आहे.
या सर्व उपक्रमांचे नेतृत्व सभापती अशोक आधार पाटील व उपसभापती सुरेश पिरन पाटील यांनी केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सन्माननीय संचालक मंडळ, सचिव व कर्मचारी वृंद, व्यापारी, हमाल, मापाडी, गुमास्ता बांधू आणि शेतकरी बांधव यांनी एकत्र येऊन कार्यक्रम यशस्वी केला.
राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि कृषी क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे आ. अनिलदादा पाटील यांना वाढदिवसानिमित्त सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छांचा वर्षाव केला असून, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.
“आपल्या कार्यातून जनतेच्या मनात कायमचे स्थान निर्माण करणाऱ्या आ. अनिलदादा पाटील यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!”









