माजी मंत्री आमदार अनिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत विविध उपक्रमांचे आयोजन

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

अमळनेर (अटकाव न्यूज  )येथील अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने माजी मंत्री आ.अनिल भाईदास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शेतकरी व सभासदांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन ७ जुलै सोमवार दुपारी ४ वाजता करण्यात आले आहे.
कृषी उत्पन्न बाजार समिती अमळनेर येथे मा.आ.अनिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त बैल जोडी असणाऱ्या तालुक्यातील शेतकरी सभासदांसाठी सभासदांना पोळा सणासाठी बैलांचा साज वाटप शुभारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तसेच अनिल पाटील यांची शैक्षणिक साहित्याची तुला करण्यात येणार आहे या शैक्षणिक साहित्याचे वाटप तालुक्यातील गरीब गरजू विद्यार्थ्यांना करण्यात येईल. तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती येथील मापाडी कामगारांसाठी लॉकर उपलब्ध करून देण्यात येणार असून मापाडी यांना वैयक्तिक लॉकरच्या किल्ल्या वाटप आ.अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
तरी अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे ७ जुलै सोमवार रोजी दुपारी ४ वाजता शेतकरी सभासद तसेच आ.अनिल पाटील यांच्यावर प्रेम करणाऱ्या मंडळींनी उपस्थित रहावे असे आवाहन सभापती अशोक पाटील, उपसभापती सुरेश पाटील व संचालक मंडळ यांचेकडून करण्यात आले आहे.

Atkav News
Author: Atkav News

Leave a Comment

और पढ़ें