
अमळनेर: हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर मांडळ येथे ६१ फूट उंच ध्वजाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात व शिवभक्तांच्या जयघोषात पार पडले. या सोहळ्याच्या निमित्ताने आजाद चौक सुशोभीकरणाचे उद्घाटनही करण्यात आले. या कार्यक्रमास विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली होती.
ध्वज व सुशोभीकरण उद्घाटन सोहळा भव्य स्वरूपात संपन्न
ध्वज फडकावून उद्घाटनाचा सोहळा पार पडला. त्यानंतर आजाद चौकातील सुशोभीकरणाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले. अमळनेर बाजार समितीचे सभापती मा. श्री. दादासो अशोक आधार पाटील, बाजार समितीचे संचालक समाधान भाऊ धनगर, हिरालाल पाटील, तसेच मांडळ गावाच्या माजी सरपंच सौ. रंजनाबाई जितेंद्र पाटील यांनी पारंपरिक औक्षण करून उपस्थित मान्यवरांचा सत्कार केला.
कार्यक्रमास मान्यवर आणि ग्रामस्थांची मोठी उपस्थिती
या सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी हजेरी लावली. यामध्ये जितेंद्र पाटील, मनोहर पाटील, बाळासाहेब पवार, डॉ. अशोक पाटील, डॉ. सुनील चोरडिया, विनायक बडगुजर, वसंतदास भाऊ, संतोष आबा पाटील, संजय पाटील, रवींद्र पाटील, प्रभाकर पाटील, शिवाजी रोडे, रामा जीवन कोडी, नाना धनगर, मा. सरपंच समाधान पाटील, उत्तम सर, सुनील पाटील, रवींद्र पाटील, संजय पाटील, मोहन भाऊसाहेब, डॉ. दीपक पाटील, संजय धनगर, अण्णाजी टेलर, वसंत बापू, रमा पैलवान, पुंजू मास्तर, सुनील बच्छाव, सुनील जैन, अनिल जैन, भाऊराव आबा, पांडू भिल, हेमंत पाटील, महेश धनगर, राजेंद्र गुरुजी, दरबार मुसा, जितू कोळी, सुनील आप्पा बडगुजर, प्रकाश पाटील, योगेश कोडी, गोकुळ शिरसाट, सुरेश पाटील, भैया पाटील, शशिकांत बडगुजर, हिरामण नाना, वासू मामा, खेमचंद पाटील, सागर टेलर, नितीन पाटील, शांताराम टेलर, श्याम लोहार, राहुल लोहार, गोरख कोळी, गोरख भोई, राजेंद्र मराठे, रोहिदास भोई, अरे मिस्तरी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
याशिवाय विकास सोसायटीचे सर्व सदस्य, आजाद मित्र मंडळ, शिव साई समिती मित्र मंडळ मांडळचे पदाधिकारी, आणि गावातील शेकडो शिवभक्तांनी कार्यक्रमात सहभाग घेतला.
गावकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल निस्सीम श्रद्धा असलेल्या ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात या सोहळ्यात भाग घेतला. विशेषतः युवकांचा सहभाग लक्षणीय होता. पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशा, आणि शिवजयंतीला साजेसा उत्साह या सर्वांनी कार्यक्रम अधिक भव्यदिव्य झाला.
सामाजिक एकतेचा संदेश
या कार्यक्रमाच्या निमित्ताने मांडळ गावातील सामाजिक एकता अधोरेखित झाली. ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांप्रती आपली निष्ठा व्यक्त केली.
