Search
Close this search box.

पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून खासदार स्मिता वाघ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

नवी दिल्ली – देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नवी दिल्ली येथे खासदार स्मिताताई वाघ यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभाशीर्वाद दिले.

या विशेष प्रसंगी खासदार स्मिताताई वाघ यांचा संपूर्ण परिवार उपस्थित होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदार वाघ यांच्या सामाजिक व राजकीय क्षेत्रातील योगदानाचे विशेष कौतुक केले. तसेच त्यांना पुढील वाटचालीसाठी उत्तम यश लाभो, अशी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील खासदार वाघ यांच्या जनसंपर्क कौशल्याचे आणि कार्यशक्तीचे भरभरून कौतुक केले. त्या आपल्या राजकीय आणि सामाजिक कार्याच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचत आहेत, ही निश्चितच प्रेरणादायी बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. पुढील राजकीय वाटचालीत त्यांना उत्तुंग यश मिळावे, अशी सदिच्छा शहा यांनी व्यक्त केली.

हा सन्मान आणि शुभेच्छांचा क्षण खासदार स्मिताताई वाघ आणि त्यांच्या कुटुंबासाठी अभिमानास्पद ठरला. या शुभेच्छांमुळे त्यांना नव्या उर्जेची प्रेरणा मिळाली असून, त्या भविष्यातही जनसेवेच्या कार्यात अधिक जोमाने कार्यरत राहतील, असे त्यांनी सांगितले.


(ताज्या घडामोडी आणि अधिक माहितीसाठी आमच्याशी संपर्कात राहा.)

Atkav News
Author: Atkav News

Leave a Comment

और पढ़ें