“अमळनेरचा कायापालट पाहायचा असेल तर शहर विकास आघाडीला एकहाती सत्ता द्या” — आमदार अनिलदादा पाटील

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

अमळनेर (अटकाव न्यूज ):
नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमळनेरमधील विविध व्यापारी संघटनांच्या मेळाव्यात माजी मंत्री तथा आमदार अनिलदादा पाटील यांनी अमळनेरचा सर्वांगीण विकास साधायचा असेल तर शहर विकास आघाडीला एकहाती सत्ता देणे अत्यावश्यक असल्याचे ठाम प्रतिपादन केले.

शुक्रवार, दि. 28 रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात झालेल्या या मेळाव्याला खासदार स्मिताताई वाघ अध्यक्षस्थानी होत्या. माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील, माजी नगराध्यक्षा जयश्री पाटील, ओमप्रकाश मुंदडा, सरजूशेट गोकलाणी, रामदास निकुंभ, विविध व्यापारी संघटनांचे पदाधिकारी आणि शहर विकास आघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार जितेंद्र ठाकूर व सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार उपस्थित होते.

“शिरपूर–बारामती–संगमनेरप्रमाणे विकास हवा असेल तर एकहाती सत्ता आवश्यक”

आपल्या भाषणात अनिलदादांनी सांगितले की –
“लोक म्हणतात शिरपूर बघा, बारामती बघा, संगमनेर बघा… तेथे विकास झाला कारण तेथील जनतेने त्यांच्या नेतृत्वावर एकहाती विश्वास ठेवला. अमळनेरचाही विकास एका रात्रीत बदलू शकतो, फक्त शहर विकास आघाडीला एकहाती सत्ता द्या.”

ते पुढे म्हणाले –

“आम्ही सर्व जाती–धर्मातील लोकांना विचारपूर्वक उमेदवारी दिली आहे. जातीयवाद तेव्हा येतो जेव्हा मनात ते विचार असतात; आम्ही कामाला प्राधान्य दिले आहे.”

“जितेंद्र ठाकूर यांच्या उमेदवारीबाबत समितीने एकमुखी निर्णय घेतला. ते जमिनीवरच्या लोकांशी जोडलेले आहेत.”

“तुमच्या दारासमोर वाढलेली माणसेच आमचे उमेदवार आहेत; बाहेरून उचलून आणलेली नाहीत.”

“केंद्रात मी, राज्यात अनिलदादा – अमळनेरचा विकास ठरलेलाच” — खासदार स्मिताताई वाघ

खासदार वाघ म्हणाल्या –

“गेल्या पाच वर्षांत अमळनेरने झालेला विकास सर्वांनी पाहिला. डीपी रोड, प्रशासकीय कार्यालयांची एकत्र व्यवस्था, हे अनिलदादांच्या प्रयत्नांचे फळ.”

“केंद्र आणि राज्यात आम्ही जबाबदारीवर आहोत, त्यामुळे शहराच्या विकासाचा वेग वाढणार आहे.”

“पालिकेला आई समजा… जातीधर्म न पाहणारे अमळनेरकर” — साहेबराव पाटील

माजी आमदार साहेबरावदादांनी सांगितले –

“अमळनेरने कधीही जात-पात धर्म पाहिला नाही. अनेक जातीधर्मातील लोक नगराध्यक्ष झाले आहेत.”

“पालीकेची सेवा करणे म्हणजे आईची सेवा करणे होय. सर्वांगीण विकासासाठी शहर विकास आघाडीला एकहाती सत्ता हवी.”

“चार वर्षे प्रशासक असूनही विकास थांबला नाही” — माजी नगराध्यक्षा जयश्रीताई पाटील

त्या म्हणाल्या –

“अनिलदादांनी प्रशासक असतानाही जनतेची गैरसोय होऊ दिली नाही.”

“बाजारपेठेतील सर्व रस्ते उत्तम दर्जाचे आहेत. आज शहरात एकही खड्डा दिसत नाही.”

“जळगावहून आलेल्या उमेदवाराकडे शहराच्या भवितव्याची जबाबदारी देऊ नका.”

विकासाच्या ठळक कामांची मांडणी

✔ व्यापारी संकुल – रामदास निकुंभ

“आठवडे बाजारातील अतिक्रमण विश्वासाने हटवून भव्य व्यापारी संकुल उभारले. पालिकेचे उत्पन्न वाढणार आहे.”

✔ ४ हजार कोटींची विकासकामे – ओमप्रकाश मुंदडा

“उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून सुमारे 4 हजार कोटींची कामे अमळनेर आणि मतदारसंघात झाली.”

✔ अमळनेरचे रूपांतर – ॲड. राजेंद्र निकम

दर्जेदार रस्ते

क्रीडा संकुल

बोरी नदीवरील पूल

पर्यटनस्थळ म्हणून विकसित मंगळ ग्रह मंदिर

सुसज्ज रेल्वे स्थानक

पाडळसे धरणाचे काम मार्गी

“अमळनेर आज कुठे उभा आहे हे प्रत्येकाला दिसत आहे.”

व्यापारी संघटनांकडून मिळालेला प्रचंड प्रतिसाद, नेत्यांनी मांडलेले विकासकामांचा आलेख आणि भावी व्हिजन पाहता अमळनेरच्या प्रगतीचा मार्ग शहर विकास आघाडीमुळे आणखी मजबूत होणार आहे.

“एकहाती सत्ता द्या… आणि अमळनेरचा विकास कसा झेपावतो ते बघा!” — आमदार अनिलदादा पाटील

Atkav News
Author: Atkav News

Leave a Comment

और पढ़ें