
अमळनेर, दि. ६ जुलै — मोहरमच्या निमित्ताने अमळनेर शहरात इराणी मुस्लिम बांधवांच्या वतीने पारंपरिक शोकमिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. हजरत इमाम हुसेन यांच्या बलिदानाच्या स्मरणार्थ काढण्यात आलेल्या या मिरवणुकीत शेकडो भाविक सहभागी झाले होते. मातम पथकांच्या उपस्थितीत शहराच्या मुख्य रस्त्यांवरून ही मिरवणूक शिस्तबद्ध आणि भावपूर्ण वातावरणात पार पडली.
या मिरवणुकीदरम्यान सुभाष चौक येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नगरसेवक आरिफ भाया यांच्या वतीने विशेष सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी इराणी समाजाचे अध्यक्ष अख्तर अली यांचा शाल, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाला अमळनेर पोलीस स्टेशनचे निरीक्षक निकम साहेब यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. शांतता, ऐक्य आणि सामाजिक सलोखा यांचे प्रतीक म्हणून पार पडलेल्या या कार्यक्रमाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.









