
अमळनेर : शिवसेना (शिंदे गट) ने अमळनेर तालुक्याच्या नेतृत्वात मोठा बदल करत सुरेश अर्जुन पाटील यांची तालुका प्रमुखपदी नियुक्ती केली आहे. वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारसरणीचा वारसा आणि धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण पुढे नेत, सुरेश पाटील हे आता तालुक्यातील शिवसेनेचे नेतृत्व करतील.
या निवडीसाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख मा. एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार व शिवसेना पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या विश्वासावर ही नियुक्ती करण्यात आली आहे. संसदरत्न खा. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते सुरेश पाटील यांना अधिकृत नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावर शिवसेना पक्षाचे सचिव संजय मोरे यांची अधिकृत स्वाक्षरी आहे.
सुरेश पाटील यांच्याकडून पक्षश्रेष्ठींनी हिंदुत्ववादी विचारसरणीचा प्रचार आणि पक्ष संघटन बळकट करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. तालुक्यातील सर्व गट-प्रगटांना एकत्रित घेऊन कार्य करण्याची दिशा या निवडीमुळे निश्चित झाली आहे.
या विशेष प्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते. यामध्ये पारोळ्याचे आमदार अमोल पाटील, पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील, मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील, उत्तर महाराष्ट्राचे सहसचिव भाऊसाहेब चौधरी, जिल्हा संपर्क प्रमुख सुनील चौधरी, जिल्हा प्रमुख वासुदेव पाटील, अमळनेर शहर प्रमुख संजय कौतिक पाटील, महिला जिल्हा प्रमुख सारिका माळी यांचा समावेश होता.
या नियुक्तीबद्दल राज्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सुरेश पाटील यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच माजी आमदार चिमणराव पाटील, कृषिभूषण साहेबराव पाटील, जळगाव युवा नेते प्रताप गुलाबराव पाटील, माजी नगरसेवक विक्रांत पाटील, डॉ. राजेंद्र पिंगळे, अमित ललवाणी, युवा सेना जिल्हा प्रमुख रोहित कोकटा, प्रवीण पाटील, जालना जिल्हा संपर्क प्रमुख डॉ. विजय पाटील, रिटा बाविस्कर, डॉ. प्रशांत शिंदे, ढेकू सिमच्या सरपंच सुरेखा प्रवीण पाटील, हेडावेचे माजी सरपंच रवींद्र पाटील, रितेश बोरसे व ग्राहक कल्याण मंचचे जिल्हाध्यक्ष हेमंत भांडारकर यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला.
शिवसेनेच्या अमळनेर तालुक्यातील संघटनात्मक बांधणीस नवसंजीवनी मिळणार असल्याचा विश्वास या निवडीनंतर व्यक्त केला जात आहे.
