Search
Close this search box.

जखमी बगळ्याला जीवनदान जी.एस. हायस्कूलच्या करुणा क्लबच्या विद्यार्थ्यांची माणुसकी जपणारी कृती

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें


विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मदतीने केले प्रथमोपचार, करुणा क्लबकडे सोपवून दाखवली संवेदनशीलता

प्रतिनिधी | अमळनेर
जी.एस.हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, अमळनेर येथील करुणा क्लब क्र. 1923 च्या दोन विद्यार्थ्यांनी शालेय आवारात जखमी अवस्थेत आढळलेल्या बगळ्याचा जीव वाचवून एक आदर्शवत उदाहरण घालून दिले आहे. शाळेतील परीक्षा संपल्यानंतर ही घटना घडली.

इयत्ता सातवीत शिकणारे यश विनोद धनगर आणि रोहित मनोहर पाटील हे विद्यार्थी शालेय प्रांगणात फिरत असताना त्यांना एक बगडा जखमी अवस्थेत जमिनीवर पडलेला दिसला. त्यांनी तात्काळ शाळेतील शिक्षक गणेश चव्हाण यांना माहिती दिली. त्यानंतर त्यांनी मिळून त्या पक्ष्यावर प्रथमोपचार केले. बगळ्याला साखरेचे पाणी पाजण्यात आले आणि त्याच्या जखमेवर हळद लावण्यात आली.

या घटनेची माहिती करुणा क्लबचे समन्वयक डी. एन. पालवे यांना दिल्यानंतर त्यांनी तो बगडा आपल्या ताब्यात घेऊन पुढील उपचारासाठी नेला. ही संपूर्ण कृती अतिशय वेगाने आणि सजगतेने पार पाडण्यात आली.

मुख्याध्यापक बी. एस. पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षकांच्या या संवेदनशीलतेचे कौतुक केले. त्यांनी विद्यार्थ्यांना प्राणीमात्रांप्रती दयाभाव बाळगावा असे सांगत, करुणा क्लबशी अधिकाधिक विद्यार्थी जोडावेत असे आवाहन केले.

Atkav News
Author: Atkav News

Leave a Comment

और पढ़ें