Search
Close this search box.

सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात कार्य करणार्‍या सुनिता मोरे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मान

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

अमळनेर :
अमळनेर येथील सौ. सुनिता हृदयनाथ मोरे यांना त्यांच्या सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2025 ने सन्मानित करण्यात आले. सार्थक सिद्ध सेवा फाउंडेशन, जळगाव यांच्यावतीने देण्यात येणारा हा राज्यस्तरीय प्रतिष्ठेचा पुरस्कार यंदा सुनिता मोरे यांना केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री ना. रामदास आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत जळगाव येथे झालेल्या भव्य समारंभात प्रदान करण्यात आला.

समारंभात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) चे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष रमेश मकासरे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी रिपाईचे पूर्व जिल्हाध्यक्ष भगवानभाई सोनवणे, पश्चिम जिल्हाध्यक्ष आनंद खरात, जळगाव महानगर अध्यक्ष अनिल अडकमोल, तसेच सार्थक सिद्ध सेवा फाउंडेशनच्या अध्यक्षा लक्ष्मी कुमावत सोनवणे आणि इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.

सुनिता मोरे यांचे गेल्या अनेक वर्षांपासून सांस्कृतिक जपणूक, स्त्री सक्षमीकरण, सामाजिक न्याय, तसेच उपेक्षित घटकांसाठी विविध उपक्रम राबवण्याचे कार्य सुरू आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक समाजहिताच्या चळवळींना दिशा मिळाली आहे.

या पुरस्काराने त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना सन्मानित करण्यात आल्यामुळे अमळनेर शहरासह संपूर्ण जिल्ह्यातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्यांनी मिळवलेल्या या सन्मानामुळे नवोदित कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळेल, असे मतही यावेळी अनेक मान्यवरांनी व्यक्त केले.

सुनिता मोरे यांनी पुरस्कार स्वीकारताना सर्व सहकाऱ्यांचे, कुटुंबीयांचे आणि समाजातील सर्व घटकांचे आभार मानले. “हा सन्मान माझ्यासाठी केवळ पुरस्कार नाही, तर पुढील सामाजिक कार्यासाठी एक नवीन प्रेरणा आहे,” असे त्या म्हणाल्या.

Atkav News
Author: Atkav News

Leave a Comment

और पढ़ें