
अमळनेर ( अटकाव न्यूज- हितेंद्र.जे.बडगुजर):
अमळनेर विधानसभा मतदारसंघातील लोकप्रिय कार्यसम्राट, माजी आमदार मा. शिरीषदादा चौधरी यांचा वाढदिवस दिनांक ४ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ६ ते रात्री ११ वाजेपर्यंत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या अभिष्टचिंतन सोहळ्यास तालुक्यातील राजकीय, सामाजिक, आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली.
इंदुमाई निवास येथे भावनिक सोहळा
स्थानिक इंदुमाई निवास, स्टेशन रोड, अमळनेर येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात हजारोच्या संख्येने कार्यकर्ते, चाहते, नगरसेवक, पंचायत समिती सदस्य, सरपंच, आणि सामान्य नागरिकांनी शिरीषदादांवर प्रेमाचा वर्षाव केला.
शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. मित्रपरिवाराच्या वतीने करण्यात आलेल्या विशेष निमंत्रणामुळे संपूर्ण परिसरात एक उत्सवाचं वातावरण पाहायला मिळालं.
भावस्पर्शी सूत्रसंचालनाने रंगत वाढली..
यावेळी बोलताना शिरीष दादा मित्रपरिवार आघाडीचे गटनेते बबली पाठक यांनी आपल्या भाषणातून उपस्थितांची मनं जिंकली. त्यांनी म्हटलं, “मेरा पानी उतरता देख, मेरे किनारे पर घर मत बसा लेना, मैं समुंदर हूं, लौट कर जरूर वापस आउंगा…”
जनतेचा दमदार आमदार
हा वाढदिवसाचा सोहळा केवळ एक औपचारिक कार्यक्रम नव्हता, तर तो होता जनतेच्या प्रेमाचा, कार्यकर्त्यांच्या निष्ठेचा आणि एका नेता म्हणून शिरीषदादांच्या कर्तृत्वाचा साक्षात्कार.
