
अमळनेर, दि. 16 मार्च 2025: अमळनेर शहरात अवैधरित्या दारूची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती . पोलीस उपअधीक्षक केदार बारबोले यांना मिळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तब्बल ₹1,28,080/- किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांची कारवाई
पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, एक प्याजो रिक्षा (बजाज ॲपे) मधून चोरटी दारू वाहतूक केली जात होती. या वृत्ताची गंभीर दखल घेत बारबोले साहेब यांनी पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर यांच्या नेतृत्वाखाली एक पथक तयार केले. या पथकात पोलीस हेडकॉन्स्टेबल मिलिंद सोनार, पोलीस कॉन्स्टेबल विनोद संदानशिव, प्रशांत पाटील, उज्वल मस्के आणि निलेश मोरे यांचा समावेश होता.
या पथकाने तत्काळ कारवाई करत चोपडा रोडवरील मंगळ ग्रह मंदिराजवळील सार्वजनिक ठिकाणी सदर रिक्षा अडवली. चौकशी केली असता रिक्षा चालक धनराज अशोक चौधरी (वय 46, रा. अमळगाव, ता. अमळनेर) याच्याकडे मोठ्या प्रमाणात दारू साठा आढळून आला.
जप्त केलेला मुद्देमाल:
- मॅकडॉल व्हिस्की – 144 कॉटर (₹23,040/-)
- रॉयल स्टॅग – 95 कॉटर (₹18,240/-)
- इम्पेरियल ब्लू – 48 कॉटर (₹7,680/-)
- रॉयल चॅलेंज – 48 कॉटर (₹9,120/-)
- बजाज ॲपे रिक्षा – (₹70,000/-)
➡️ एकूण जप्त मुद्देमाल: ₹1,28,080/-
प्रवीण चौधरीचा सहभाग उघड
चौकशी दरम्यान, आरोपी धनराज चौधरी याने ही अवैध दारू प्रवीण काशिनाथ चौधरी (रा. अमळगाव, ता. अमळनेर) यांच्या सांगण्यावरून वाहतूक करत असल्याचे कबूल केले. यामुळे पोलिसांनी प्रवीण चौधरी यालाही आरोपी म्हणून गजाआड केले आहे.
गुन्हा दाखल
या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल उज्वल मस्के यांच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 107/2025 अन्वये मुंबई दारूबंदी अधिनियम कलम 65(अ), 65(ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल गणेश पाटील करीत आहेत.
➡️ अमळनेर पोलिसांच्या वेळीच केलेल्या कारवाईमुळे मोठ्या प्रमाणावर होणारी अवैध दारू तस्करी रोखली गेली असून, पुढील तपास सुरू आहे.
