अमळनेरमध्ये केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या कन्येच्या छेडछाडीप्रकरणी आरोपींना अटक का नाही? नागरिकांचा संताप

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

अमळनेरमध्ये केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या कन्येच्या छेडछाडीप्रकरणी आरोपींना अटक का नाही? नागरिकांचा संता

अमळनेर (प्रतिनिधी): केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या कन्येची छेडछाड करणाऱ्या आरोपींना अद्याप अटक झाली नाही. त्यामुळे सर्वसामान्य शेतकरी कुटुंबांतील मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या प्रकरणी तातडीने आरोपींना अटक करून कठोर शासन व्हावे, तसेच पोलीस प्रशासनातील संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी अमळनेर शहरातील विविध राजकीय पक्ष, सामाजिक कार्यकर्ते आणि पाडळसरे धरण जन आंदोलन समिती यांच्या वतीने करण्यात आली.

आज तहसील कार्यालयात तहसीलदार रुपेशकुमार सुराणा आणि पोलीस उपविभागीय अधिकारी विनायक होते यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट शब्दांत प्रशासनाच्या भूमिकेवर आक्षेप घेतला.

“शेतकऱ्यांच्या मुलींच्या सुरक्षेची जबाबदारी कोण घेणार?”

निवेदन सादर करताना आंदोलकांनी काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले. अमळनेर शहरात दररोज ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. अशा परिस्थितीत जर मंत्रीमहोदयांच्या कन्येलाच न्याय मिळत नसेल, तर सर्वसामान्य कुटुंबांतील मुलींच्या सुरक्षेची हमी कोण देणार? आरोपींना अटक करण्यास विलंब का होत आहे? राजकीय दबावामुळे आरोपी पळून जाण्याची संधी मिळते आहे का?

पोलीस प्रशासनावर सहकार्याचा आरोप

यावेळी आंदोलकांनी असा आरोप केला की, प्रमुख आरोपींना काही राजकीय पाठबळ मिळत असून, त्यांना पळून जाण्यास वाव दिला जात आहे. या प्रकरणात पोलीस प्रशासनातील काही अधिकाऱ्यांचेही सहकार्य असल्याचे जाणवत आहे. त्यामुळे केवळ आरोपींवर कारवाई करून चालणार नाही, तर दोषी अधिकाऱ्यांवरही तत्काळ कठोर कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली.

या नेत्यांनी घेतला सक्रिय सहभाग

या आंदोलनात पाडळसरे धरण जन आंदोलन समितीचे प्रमुख सुभाष चौधरी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सुरेश किरण पाटील, ग्राहक मंचाचे जिल्हाध्यक्ष हेमंत भांडारकर, संचालक डॉ. अनिल शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय पुनाजी पाटील, अमळनेर अर्बन बँकेचे व्हाईस चेअरमन रणजित शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे महेंद्र बोरसे, देविदास देसले, शिंदे सेनेचे जिल्हा उपप्रमुख महेश देशमुख, काँग्रेसचे जेष्ठ नेते धनगर दला पाटील, किरण सावंत, गुणवंत पवार, तसेच पाडळसरे धरण जन आंदोलन समितीचे रामराव पवार, महेश पाटील, प्रा. सुनिल पाटील, रविंद्र पाटील, प्रसाद चौधरी, दिलीप पाटील, कैलास पाटील, प्रताप पाटील, सुशील भोईटे, ॲड. कुंदन साळुंखे, डॉ. रविंद्र पाटील आदी उपस्थित होते.

पोलीस प्रशासनाची भूमिका काय?

अमळनेर पोलीस विभागाचे उपविभागीय अधिकारी विनायक होते यांनाही निवेदनाची प्रत देण्यात आली आहे. आता पोलीस प्रशासन यावर काय भूमिका घेते आणि आरोपींवर कारवाई कधी होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सदर प्रकरणात त्वरित न्याय न मिळाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे.

Atkav News
Author: Atkav News

Leave a Comment

और पढ़ें