लेखक राजा मंगळवेढेकर यांनी साने गुरुजींवर लिहिलेले चरित्र लेखन किंवा जीवनी नुकतेच माझे वाचनात आले. राजा मंगळवेढेकर म्हणजे साने गुरुजींची धडपडणारे मुलांपैकी एक होत. गुरुजीं सोबत वावरलेली अनेक माणसे त्यांच्या अनुभव आठवणी, मुलाखती घेऊन आणि गुरुजींची पुस्तके लेख व पत्रव्यवहार डायऱ्या इत्यादीचा अभ्यास करून त्यांनी गुरुजींच्या जीवनपट उलगडण्याच्या प्रयत्न केलेला आहे. साधना प्रकाशन चे हे ग्रंथ आपल्या संग्रही असावे असे मला वाटते. माझे ओळखीचे प्राध्यापक मित्र यांना मी सांगितले मी हे पुस्तक नुकतेच वाचून वेगळे केले आहे. मी ह्यावर समीक्षा लिहावी किंवा टिप्पणी लिहावी असं त्यांनी आग्रह धरला. हे लिहिण्याची माझी पात्रता किंवा औकात नाही असे मी त्यांना सांगितले. तुम्ही ते छान लिहू शकाल असं त्यांनी मला आत्मविश्वास भरोसा दिला त्या अनुषंगाने मला जे जे आवडले ते संक्षिप्त पण इथे मांडण्याचे प्रयत्न करत आहे.आवडल्यास आपण प्रतिक्रिया द्यावी ही नम्र विनंती.
साने गुरुजींची जन्मभूमी जरी कोकणातील दापोली जिल्ह्यातील पालगड येथील असली तरी कर्मभूमी ही अमळनेर होती. त्यामुळे साने गुरुजी हे खानदेशवासियांसाठी एक दीपस्तंभ प्रेरणा स्तोत्र होते.अमळनेरच्या ह्या पवित्र संत भूमित अजूनही त्यांच्या स्मृतीच्या गंध पसरत आहे आणि तो सतत रहावा यासाठी त्यांच्या सहवास लाभलेली म्हणजे मान.प्राचार्य अरविंदजी सराफ सर आणि आजची धडपडणारी मुले श्री चेतनभाऊ सोनार दर्शना ताई पवार, श्री गोपाळ नेवे, डॉ.अतुल चौधरी, श्री मिलिंद वैद्य आदी सर्व मान्यवर अमळनेर येथे परमपूज्य साने गुरुजींचे स्मारक लवकर व्हावे यासाठी आपले जिवाचे रान करत आहेत ही भूष्णावह बाब आहे. प्रभू,परमेश्वर जवळ ह्या सर्व सदग्रस्तांनी हाती घेतलेले सद्कार्य लवकर पूर्ण होवो हीच आमची प्रार्थना!
या ग्रंथाच्या सुरुवातीलाच ” विनोबा भावेंनी साने गुरुजींच्या मृत्यूबद्दल खेद व्यक्त केला. ( जन्म 24 डिसेंबर 1899 मृत्यू 11 जून 1950) अवघे पन्नास वर्षाच्या आयुष्य. पण एवढ्यात त्यांनी केवढी प्रचंड कामगिरी केली. महाराष्ट्रातील संपूर्ण तरुण पिढीला त्यांनी आपल्या विचारांनी भारून टाकली. बाळगोपाळांना वेड लावले. रामकृष्ण परमहंस, रवींद्रनाथ टागोर आणि गांधीजी या त्यांच्या देवता होत्या. त्यांच्या मृत्यूवर माझा विश्वास बसत नाही.हे त्यांनी एक नाटक केले आहे असे मी समजतो.” ह्या ग्रंथाची भाषा अतिशय सरळ हृदयस्पर्शी मनाला भिडून जाणारी आहे. प्रस्थापित मान्यतांना झुगारून स्वातंत्र्याकरिता आपले सर्वस्व झोकून देण्याचे शोषित गरीब व अनुसूचित जाती जमातींकरिता त्यांचे बंड करून उठलेले एक शिक्षक, लेखक समाजकारणी व राजकारणी नेतृत्वाचे येथे दर्शन घडते.युवकांकरिता प्रेरणात्मक व दिशादर्शक आणि आपल्या भारत देशाच्या स्वातंत्र्यसंग्रामाच्या इतिहास सांगणारी आहे.
पांडुरंग सदाशिव साने हे गुरुजींचे पूर्ण नाव. साने हे कोकणस्थ ऋग्वेदी ब्राह्मण. वडील हे खोत चे काम करायचे म्हणजे गावातील शेतसारा गोळा करून सरकारकडे जमा करणे होय. बालपणीचे नाव पंढरी.पंढरी म्हणजेच श्याम. दोन मोठ्या बहिणी व हे पाच भवांडांपैकी ते चौथे होते. बालपणी आईकडून मिळालेले प्रेम व संस्कार श्यामला आयुष्यभर पुरले. पालगडचे घरी एकदा पाहुणे आले होते. श्यामला त्यावेळी एक पुस्तक खरेदी करत करायचे पण त्याच्यावर पैसे नव्हते ज्ञानाचे ओढीने त्यादिवशी पाहुण्यांच्या खिशातून पाच रुपये लांबविले व थोड्यावेळाने याच्या बोभाटा झाला. लगेच श्यामने चोरी कबूल करून पैसे परत केले. पुस्तके वाचून मोठा होण्यासाठी त्याने पाप केले. पण पाप ते पापच. आई म्हणाली चोरी कधी करू नये हे पहिलीचे पुस्तक वाचले ते अजून शिकले नाही वाटते,श्याम ! श्यामचे डोळे उघडले वाचणे वेगळे आणि शिकणे वेगळे हे त्याला कळले. अनेक लहान मोठ्या प्रसंगातून आई श्यामला शिकवण उपदेश करत गेली व संस्कार घडवत गेली. श्यामला नेहमी वाटायचे आई-वडिलांचे संस्कारच मुलांच्या जडणघडणीत महत्त्वाचे ठरतात. एकदा दापोलीहून पहाटे बैलगाडीतून ती दोघे निघाली. निसर्गरम्य वातावरणात बैलगाडी शांतपणे चालली होती. श्याम आईचे मांडीवर डोके ठेवून पडलेला होता. अपार मातृसुख अनुभवीत होता. आई तिच्यासाठी ओव्या/ प्रार्थना करत होती
*धनदाट या रानात
धो धो स्वच्छ वाहे पाणी! माझ्या श्यामच्या जीवनी! देव राहो!!
ही ओवी एकताच शाम उठून बसला. आईने विचारलं का उठलास? आई शामच्या जीवनात तू देवाला बोलावीत आहेस मी कशा निजू? देव येणे म्हणजे जागृती येणे.
असे म्हणतात आई-वडिलांचे आशीर्वाद किंवा दुवा हे माणसाच्या जीवनाच्या शेवटपर्यंत त्याला ढाल किंवा संरक्षण कवच म्हणून काम करते. परमेश्वरावर निस्सिम भक्ती व श्रद्धा आणि आई-वडिलांचे आशीर्वाद हे गुरुजींनी आपल्या जीवनाच्या शेवटपर्यंत अनुभविले.
कटू प्रसंग
पालगड ला एके दिवशी सावकार यांचा माणूस वामनरावजी घरी आले. वामनरावजी रकमेसाठी अडून बसले. सावकाराचे देणे देता येत नाही पण घर बांधता, मुलांना इंग्रजी शिकवतात असे ते म्हणाले. वडिलांनी म्हणजेच भाऊंनी आम्ही घर कसे बांधले ते सांगितले. बायकोच्या पाटल्याही मोडल्या असेही सांगितले. त्यावर घरासाठी बायकोच्या पाटल्या विकल्या तर सावकाराच्या देण्यासाठी बायको विका असे अभद्र शब्द वामनराव उर्मट पणाने बोलले. डोळ्यातील अश्रूंची बरोबर भाताचा घास कसाबसा गिळणाऱ्या श्यामच्या आईचे कानावर पडले, तशी ती स्वाभिमानी स्त्री चौताळलेल्या वाघिणी प्रमाणे बाहेर आली आणि तिने वामनरावांची खरडपट्टी काढली. आम्ही गरीब असू दरिद्र्यात असू पण आपले इमान व स्वाभिमान कधी विकणार नाही असे या रणरागिनीने दाखवून दिले.
शिक्षणासाठी संघर्ष
प्राथमिक शिक्षण जरी श्याम साठी थोडे सुसह्य झाले तरी पुढील शिक्षणासाठी मात्र तीव्र संघर्ष करावे लागले. ज्ञानाची भूक सोबतच आर्थिक अडचण ही आ वासून उभी होती. परंतु नातेवाईक मित्रमंडळी यांच्या प्रेरणेने व मदतीने, काही वेळेस उपाशी राहून सुद्धा श्यामने आपले महाविद्यालयीन शिक्षण पुणे येथे राहून पूर्ण केले. न्यू पूना कॉलेज मध्ये 1918 ते 1922 या चार वर्षात त्यांनी बीए ची पदवी संपादन केली. प्रा.पोद्दार, प्रा. खेडकर प्रा. ना. सी. फडके, प्रा.लागू, प्रा.आपटे आदी विद्वान प्राध्यापकांच्या सहवासाच्या वागणुकीचा आणि शिकवण्याच्या फार मोठा प्रभाव या काळात श्याम वर पडला. सन 1923 यावर्षी अमळनेर येथील सुप्रसिद्ध प्रताप तत्त्वज्ञान केंद्रात तत्त्वज्ञानाचे विद्यार्थी म्हणून त्यांनी प्रवेश घेतला. होता. 17 जून 1924 रोजी ते खानदेश एज्युकेशन सोसायटीच्या हायस्कूल मध्ये शिक्षक म्हणून रुजू झाले. इथल्या विद्यार्थ्यांमध्ये रममाण झाले व लोकप्रिय सुद्धा झाले आणि साने सर म्हणून त्यांची एक छबी निर्माण झाली. विद्यार्थ्यांमध्ये समरस होणारे गुरुजींना हायस्कूल चे मुख्याध्यापक गोखले सरांनी त्यांना पुढे छात्रलयाची जबाबदारी सोपविली. छत्रालयात विविध स्वभावाची मुले होती.गरीब, सालस, तशी हूड, दांडगट. भांडखोर तशी समजूतदार.गुरुजी सर्वांशी प्रेमाने बोलून प्रत्येकाला समजून घेऊन त्याला सुधारण्याचे प्रयत्न करायचे. एक पुराणिक नावाचा विद्यार्थी लहानच होता. त्याला घरची आठवण यायची आणि मग रडत बसायच्या. गुरुजी त्याला पोटाशी घ्यायचे, डोळे पुसायचे, समजूत घालायचे. प्रसंगी ते आजारी विद्यार्थ्यांची सुश्रुषा सुद्धा करत. छात्रालयात गुरुजींकडून विद्यार्थ्यांना आईचे प्रेम वात्सल व अपार अशी करुणा सुद्धा मिळत असे. विद्यार्थ्यांचे ज्ञानात भर व्हावी म्हणून ” छात्रालय दैनिक ” चालू केले होते व स्वतः लिहून वाचनालयात वाचावयास ठेवत.त्यात अनेक विषय असत. विद्यार्थ्यांनी स्वदेशी मालाचा म्हणजेच खादी किंवा सुती कपड्यांच्या वापर करावा , आपल्या भारत देशाच्या व जागतिक घडामोडी बाबत अद्यावत माहिती त्यात असे.शाळेचा व छास्त्रालयाचा परिसर स्वच्छ नीट नेटका असावा असा त्यांच्या आटापिटा असे. शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांनी सामाजिक कार्य सुद्धा करावे असे त्यांना सतत वाटत असे व त्यासाठी ते प्रयत्नशील असत.
स्वातंत्र्यसंग्रामात उडी
कॉंग्रेसचे उद्देश्य स्वातंत्र्य मिळविणे हे आहे. 25 डिसेंबर 1929 रोजी लाहोरला काँग्रेसच्या अध्यक्ष पदावरून भाषण करताना पंडित नेहरूंनी वरील उद्गगार काढले. 13 मार्च 1930 रोजी सकाळी साबरमती आश्रमातून दांडी कडे पदयात्रा निघाली. त्यांच्याबरोबर भारतातील निवडक 79 सत्याग्रही होते व त्यात हरिभाऊ मोहनी हे एक होते. ते गुरुजींचे सहकारी होते व त्यांनी संस्थेच्या राजीनामा दिलेला होता आणि ते यात सामील झाले होते. गुरुजींची अवस्था एखाद्या पिंजऱ्यात अडकलेल्या पक्ष्या प्रमाणे झाली होती. देश प्रेम त्यांच्या ठाई ओतप्रोत भरलेला होता. 6 एप्रिल 1930 च्या दिवशी गांधीजींनी दांडीच्या समुद्र किनाऱ्यावर मुठभर मीठ उचलले व ब्रिटिश साम्राज्याच्या निषेध केला.
** उचललेस तू मीठ मुठभरी साम्राज्याच्या ढासळला पाया *
या गांधीजीच्या कृतीने देशभरात संतापाची आणि स्वातंत्र्य मिळविण्यासाठीची त्रिव्र लाट सुरू झाली. त्यांचे एक सहकारी हरिभाऊ मोहनी यांनी संस्थेत राजीनामा देऊन स्वातंत्र्यसंग्रामात उडी घेतली. गुरुजी कुठे शांत बसणार होते. गोखले सरांच्या हातात हात घेऊन नम्रपणे अभिवादन करून गुरुजी त्यांना म्हणाले आता नाही रहावत इथे. मुलांना गुलाम करायच्या या शाळा आता बंद केल्या पाहिजेत. जनतेला स्वतंत्र व्हायचे शिक्षण दिले पाहिजे.
*सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है ! देखना है कितना जोर बाजूयें कातिल में है !
29 एप्रिल 1930 रोजी गुरुजींनी शाळा सोडल्याची नोंद शाळेचे मस्टरवर Left अशा शब्दात आहे….
मकसूद
बोहरी
अमळनेर