अमळनेर : स्वपराक्रमाच्या प्रचंड मोठ्या वल्गना करणाऱ्या व्यक्तीस अचानकपणे खजील होऊन मौन होण्याचा समय येतो, तेंव्हा त्याची खूप फजिती होते. विदुर नीती सांगते की, नेतृत्व करणाऱ्या शासकाचे वर्तन आणि बोली स्वबळ समजून असावी आणि सर्वसमान असायला हवी, कथनी आणि करणी मध्ये विसंगती नसावी. महिला मेळाव्यात राणा भीमदेवी थाटात राजकीय वल्गना करणाऱ्या स्वंयघोषीत बेगडी भूमिपुत्राची बालिशासारखीच गत झाली आहे. त्याच्यात एवढी हिम्मत होती तर मग त्याने निवडणुकीच्या कालावधीत एकतरी जाहीर सभा घेऊन दाखवायला पाहिजे होती, अशी निर्भत्सना डॉ.रवींद्र चौधरी यांनी केली आहे.
स्वकर्तृत्वाच्या, स्वपराक्रमाच्या घोषणांनी आकाशपाताळ दणाणून टाकणारा स्वयंघोषीत भूमिपुत्र विधानसभा रणसंग्रामातील शिरीष चौधरींना मिळणारे समर्थन पाहता गारद झाला आहे. त्याची क्षमता त्याला स्वतःच्या मनाच्या आरशात स्वच्छ दिसलेली आहे. एवढा वेळ पराक्रमाच्या मोठ्या गप्पा मारणाऱ्या तथाकथित भूमिपुत्राची सत्याचा सामना करताना मात्र बोबडीच वळाली. पराक्रमांच्या घोषणांनी आकाश दणाणून सोडणारा त्याचा आवाज, शौर्याच्या गाथांनी ओथंबून गेलेली त्याची स्वस्तुतीची प्रदीर्घ स्तोत्रे अचानकपणे लोप पावली आणि त्याच्या तोंडातून मोजके दोन चार शब्द बाहेर पडत आहेत. स्वपरबळाबळ समजल्यामुळे त्याची ही अशी गलितगात्र अवस्था झालेली आहे.
शिरीष चौधरींचे वाढते समर्थन पाहता त्याची वाणी बदलली आणि फजिती झाली आहे. लोकशाहीच्या रणसंग्रामात त्याने युद्धाआधीच शस्त्रे टाकली आहेत. सूतगिरणी आहे तेथेच राहणार आहे याचा निर्वाळा केला आहे. शहादा साखरकारखान्याचे देणे चुकते केले आहे. मात्र कोणतेही मुद्दे नसल्याने आणि पराभव स्पष्ट दिसून येत असल्याने आपले चाटे, चमचे, चेले, भटुरे, भाड, भाट, करणाऱ्या लायकीशून्य लाभार्थी कार्यकर्त्यांच्या नावाने पत्रके काढत आहे. चौधरीबंधुंवर चिखलफेक करणाऱ्या बगलबच्च्यांनी आपण किती पाण्यात आहोत हे आधी तपासून पहावे. शिरीष चौधरी यांनी पुनर्वसन अंतर्गत साडेसात कोटींची कामे त्यांच्या कार्यकाळात केली आहेत. तर त्याच खात्याच्या या मंत्र्याच्या कार्यकाळात सव्वा दोन कोटीची कामे झाली आहेत. यामुळे जनतेची दिशाभूल करू नये, जनता सुज्ञ आहे.
शिरीष चौधरींनी करोडो रूपयांची पदरमोड करत कोरोना काळात रेमडेसिवीर उपलब्ध करून दिले. सर्व मतदारसंघात धुरळणी, फवारणी आणि सॅनिटायझरिंग केले, हे आम्ही पाप केले का? जनतेला वाऱ्यावर सोडून घरात लपलेला हा कसला भूमिपुत्र ? याची जनतेला सर्व़श्रृत माहिती आहे.
पीक विमा कंपनीकडून शेतकऱ्यांच्या कष्टाचा आणि घामाचा पैसा याने खाल्ला, विमा कंपनीकडून पैसे घेतलेत हे मतदारसंघालाच नव्हे तर राज्यभरातील जनतेला आणि राज्यकर्त्यांनाही माहिती आहे. म्हणून राज्य स्तरीय नेत्यांनी इथे येण्याचं टाळलं.. आणि मंत्री ला वाळीत टाकले.
याने तालुक्याचा दुष्काळी तालुक्यात समावेश केला नाही. याची अक्षम्य चूक झाली पण हा मान्य करण्यास तयार नाही.
जनतेचे समाधान केले नाही, भ्रमनिराश केला त्यामुळेच याची जनतेसमोर जाण्याची हिंम्मत झाली नाही. जनतेच्या आणि शेतकऱ्यांच्या आक्रोशाला आपल्याला सामोरे जावे लागेल या भितीमुळेच प्रचाराच्या कालावधीत एकही जाहीर सभा घेतली नाही. हा किती भ्रष्ट आहे आणि हा निवडून येत नाही याचे आकलन झाल्यामुळेच लाडकी बहीण मेळाव्यासह प्रचारादरम्यान मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी याच्या कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्याचा दावा डॉ.चौधरी यांनी केला आहे.
उग्रमी, अहंकारी, भ्रष्ट आणि निवडून येण्याची सूतराम शक्यता नाही हा मतदारसंघातील कौल पाहता कॅबिनेट दर्ज्याच्या मंत्र्याच्या मतदारसंघाकडे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी पाठ फिरवली. जनतेच्या आणि शेतकऱ्यांच्या रोषाला आपल्याला सामोरे जावे लागेल म्हणून स्वत:नेही एकही जाहीर सभा ग्रामीण अथवा शहरी भागात घेतली नाही, ही खूप मोठी शोकांतिका आहे. त्यांनी आधीच आपला पराभव मान्य केला असल्याचीही पुस्ती डॉ.रवींद्र चौधरी यांनी जोडली. या निवडणुकीत अमळनेकर जनता आपला तिसरा डोळा उघडून नवा इतिहास घडवेल असा विश्वासही डॉ.चौधरी यांनी व्यक्त केला आहे.