अनिल भाईदास पाटील यांचा क्रमांक 2 त्यावरच मतदान करा-महायुती पदाधिकाऱ्यांचे आवाहन
अमळनेर : मतदारसंघात महायुतीचे भूमिपुत्र उमेदवार अनिल भाईदास पाटील यांच्यासाठी शहर व ग्रामिण भागात सारेच जण एकवटल्याने विरोधकांना पराभव समोर दिसू लागला असून यासाठी मतदारांची दिशाभूल करण्यासाठी विरोधकांडून डमी गुलाबी पत्रक सर्वत्र वाटली जात आहेत,मात्र भूमिपुत्र अनिल पाटील यांचा बॅलेट मशीन वरील क्रमांक 2असून चिन्ह घड्याळ आहे,तरी त्यावरच मतदान करावे असे आवाहन महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
यासंदर्भात भाजपाचे तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील,राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष भागवत पाटील आणि शिवसेना तालुकाप्रमुख प्रथमेश पवार यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की महाराष्ट्र राज्यात महायुतीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने यंदा प्रचारासाठी गुलाबी थीम वापरली असून संपूर्ण प्रचार याच थीम वर आधारित आहे,प्रचार पत्रके देखील गुलाबी आहे.अमळनेर मतदारसंघात अनिल पाटील महायुती तर्फे राष्ट्रवादी चे उमेदवार असल्याने गुलाबी थीम त्यांनीही वापरली आहे.याच मतदारसंघात अनिल पाटील यांच्या नावाचे साम्य असलेला अजून एक उमेदवार असल्याने गुलाबी पत्रकावर त्याचा बँलेट मशीन वरील क्रमांक टाकून ती पत्रके ग्रामिण भागात वाटली जात आहेत.या निवडणुकीत अनिल पाटील यांना मतदारांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्याने त्यांना भरभरून मते मिळून ते मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असेच चित्र असल्याने विरोधकांना धडकी भरली असून अनिल पाटील यांना मिळणारी मते नाव सामर्थ्य असलेल्या डमी उमेदवारास पडावी यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या ते करू लागले आहेत.परंतु मतदार राजा हुशार असून चुकीचे बटन ते कधीही दाबणार नाहीत. आज स्थितीला येथील प्रत्येक भूमिपुत्र आणि लाडक्या बहिणींच्या डोक्यात अनिल भाईदास पाटील,क्रमांक 2,निशाणी घड्याळ हे फिट झाले असून कुणी काहीही केले तरी फरक पडणार नाही.
आणि विरोधकांनी देखील अश्या पांचट खेळी करण्यापेक्षा अजून दोन दिवस हातात शिल्लक असल्याने प्रामाणिक प्रयत्न करून पाहावेत,मात्र काहीही केले तरी पराभव मात्र आपला निश्चित आहे हे देखील ध्यानात घ्यावे असे या पत्रात म्हटले आहे.