अमळनेर : तालुक्यातील युवक- युवतीचे प्रश्न सोडावेण्यासाठी अमळनेर तालुक्याचे भूमिपुत्र आमदार मंत्री अनिल भाईदास पाटील व खासदार.सौ.स्मिताताई वाघ हेच नेहमी अग्रेसर राहिल्यामुळे तालुक्यातील युवकांचे मोठे पाठबळ महायुतीला मिळत असल्याचे मत भारतीय जनता युवा मोर्चा अमळनेर शहर उपाध्यक्ष सौरभ लोटन पाटील यांनी व्यक्त केले आहे.
या ५ वर्षाच्या कार्यकाळात पोलीस भरती असो वा विविध प्रकारच्या भरती व शैक्षणिक कामासाठी असो त्या साठी लागणारे अनेक कागदपत्रे लवकरात लवकर मिळवून देण्यासाठी दादा नेहमी कटिबद्ध राहिले आहेत. दादांच्या आमदारकीच्या सुरुवातीच्या काळात अनेक गावात तरुणांचे आरोग्य सुदृढ राहावे यासाठी व्यायामाचे साहित्य, अनेक गावात व्यायामशाळा, भरती व स्पर्धा परीक्षा देणाऱ्या युवक, युवतींना अनेक प्रकाशनाचे पुस्तके, क्रिडा साहित्य, व राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार होण्यासाठी बंद पडलेल्या क्रिडा संकुलासाठी भरीव निधीचे योगदान दादाच्या माध्यमातुन देण्यात आले आहे.
म्हणून यंदाच्या निवडणुकीत तालुक्यातील अनेक युवक-युवती भूमिपुत्र आमदार मंत्री अनिल दादा पाटील यांच्या मागे उभे असून भूमिपुत्र अनिल दादा बहुमताने निवडून येतील व महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचे सरकार येणार आशा विश्वास सौरभ पाटील यांनी व्यक्त केला आहे.