मतदानापासून वंचित न राहता जास्तीतजास्त मतदान करण्याचे केले आवाहन
अमळनेर: विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूकित प्रचार दौऱ्यादरम्यान आपण साऱ्यांनी मला प्रचंड प्रोत्साहन आणि आशीर्वाद दिलाच आहे. आज वेळ आली आहे मतदानाची खरे तर कुणीही मतदान करताना वंचित राहू नका,आणि आपल्या मतदारसंघाचे भविष्य उज्वल करण्यासह पुढील पिढीला काहीतरी चांगले देण्यासाठी बँलेट मशीन वरील क्रमांक 2 वरील घड्याळ या चिन्हां समोरचे बटण दाबून तुमच्या भूमीपुत्राला जास्तीतजास्त मतांनी विनयी करा असे आवाहन महायुतीचे उमेदवार अनिल भाईदास पाटील यांनी केले आहे.
जनतेला आवाहन वजा विनंती करण्याच्या दृष्टीने त्यांनी म्हटले आहे की आपल्या सर्वांच्या प्रचंड प्रतिसादामुळे माझा उत्साह खूपच वाढला असून विजयाची तर मुळीच चिंता राहिली नाही तरीही आपल्याला गाफील राहायचे नसून तुमचे नातेवाईक असतील,मित्र असतील किंवा कौटुंबिक सदस्य असतील त्याना सांगणे आवश्यक आहे.मतदारसंघाचा सर्वांगीण विकास आणि या भूमीचे संरक्षण हेच ध्येय प्रामुख्याने आपले असून कोणत्याही परिस्थितीत पाडळसरे धरण आपल्याला पूर्ण करायचे आहे., शहर व ग्रामीण भागात कोणताही रस्ता दुर्दशाग्रस्त राहायला नको हा आपला उद्देश आहे.सर्वात महत्वाचे म्हणजे या भूमीत जातिजातीत कोणताही भेद न राहता पूर्वीप्रमाणे सर्व एकोप्याने राहावे आपले अनेक वर्षांचे जिव्हाळ्याचे नाते वृद्धिंगत व्हावे हीच माझी प्रामाणिक इच्छा आहे..
मला सांगताना दुःख होते की कुणीतरी दीडशे किलो मीटर वरून येतो आणि केवळ स्वार्थ साधण्यासाठी आपल्या एकोप्यात दरी निर्माण करतो ही थांबविणे आवश्यक आहे.आज आपण साऱ्यांनी भूमीपुत्रासाठी भरभरून मतदान केल्यास बाहेरची मंडळी कायमची हद्दपार होऊन एक नवीन एकोप्याचे पर्व सुरू होणार आहे.यासाठी काळजीपूर्वक मतदान करा,कुणाला काहीही काम असले तरी आजच्या दिवस थोडा वेळ सर्व बाजूला ठेऊन आपल्या भूमीसाठी वेळ काढा आणि घड्याळाला मतदान करा असे आवाहन अनिल पाटील यांनी केले आहे.