अमळनेर:- मंत्री अनिल पाटील यांना विविध संघटना व समाजाने पाठिंबा मिळत असून अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी ही शिंपी समाजाच्या वतीने मंत्री अनिल पाटील यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला आहे.
देशहित व राष्ट्रहित डोळ्यासमोर ठेऊन प्रत्येक मतदारसंघातील योग्य उमेदवाराला शिंपी समाजाचा वतीने पाठिंबा देण्यात येत असून अमळनेर येथील शिंपी समाजाने ही मंत्री पाटील यांना पाठिंबा दिला आहे. सदर पाठिंब्याचे पत्र माजी जिल्हा परिषद सदस्या जयश्री अनिल पाटील यांना सुपूर्द करण्यात आले. त्यावेळी राज्य संघटक मनोज भांडारकर, पदाधिकारी प्रमोद शिंपी, शरदराव सोनवणे, सुनील शिंपी, निलेश भांडारकर, अभिजित भांडारकर यांसह मान्यवर उपस्थित होते.