आमचं पक्क ठरलं हाय,,,या तिकडीच करायच काय?

आम्ही लाडकी बहीण योजनेच्या प्रचारक लाडका भाऊ अनिलंदादांनाच विजयी करणार- नूतन विलास पाटील (सी.आर.पी)

अमळनेर: आमचं पक्क ठरलं हाय,या तिकडीच करायच काय?आम्ही लाडक्या भावाच्या लाडक्या बहिणी,
प्रसंगी होतो झाशीच्या राणी.
म्हणूनच आमचं ठरल हाय,
या तिकडीच करायच काय,असा नारा चौधरी बंधू आणि भगिनीस लक्ष करीत बचत गटाच्या महिला भगिनींनी भूमिपुत्र अनिल दादा पाटील यांनाच विजयी करण्याचा निर्धार केला असल्याची माहिती बचत गटाच्या प्रमुख,,, यांनी दिली.
यासंदर्भात त्यांनी म्हटले आहे की आम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या प्रचारक असून आम्ही का प्रचार करू नये, आम्ही सीआरपी (समूह संसाधन व्यक्ती ) म्हणून काम करतांना आम्हाला दशसूत्रीवर आधारित काम करावे लागते. त्यातले 9 वे सूत्र शासकीय योजना, 10 वे सूत्र शाश्वत उपजीविका हे आहे. गावातील प्रत्येक कुटुंबाला गटात समाविष्ट करून घेण्याचा उद्देशच तो आहे की शासकीय योजना प्रत्यक्ष लाभार्थी पर्यंत पोहचायला हवी त्यासाठी काम करतांना आम्ही महिलांशी भावनिक दृष्टया जोडल्या जातो.मग शासकीय योजनांचा लाभ व त्यातील अडीअडचणी आम्ही महिलांना समजावून सांगत असतो. हे सर्व काम करतांना प्रसंगी त्रासही तितकाच होतो,
बचतगटासाठी काम करतांना आम्ही उमेद अभियानातील ग्रामसंघांचे केडर आहोत मूल्यांकन सहित मानधनावर काम करणारे म्हणजे वेतन श्रेणीत नाही. उमेद चे काम सांभाळून प्रसंगी आम्ही रोजदारीने शेतीत देखील कामे करीत असतो.सध्या निवडणुकीची धामधूम सुरु आहे त्या आधी एका कपंनी कडून आम्हला महायुती शासनाच्या विविध योजनाचा प्रचार व प्रसार याचे रोजनदारीने काम मिळाले होते सदर काम आम्हाला आमच्या गावातच करावयाचे असल्यामुळे आम्ही अभियानाची कामाची वेळ सकाळी 10 ते संध्याकाळी 5 सोडली तर उरल्या वेळेत करू शकणार होतो.पण आमच्या वैद्यक्तिक कामाला राजकारणाशी जोडण्याचा प्रयत्न चौधरी बंधूनी आणि भगिनींने केला आहे.आम्हाला दि 5 नोव्हेंबर रोजी भावनिक साद घालून महिलांना उद्योग व्यवसाय मार्गदर्शन साठी मेळावा घेतला व तिथे त्त्यांच्या पुरुष कार्यकर्त्याने त्याच्या भाषणातून अनिल दादांनी बचतगट कार्यकर्ती ना 10 ते 15 हजारात विकत घेतले असे बदनामी कारक वादग्रस्त वक्त्यव्य केले,तसेच आम्ही निवडून आल्यावर तुमचे बचतगट बंद करून टाकू अशी महिलांशी अरेरावी ची भाषा वापरली तेव्हा तिथे उपस्थित महिलांनी आक्रमक पवित्रा घेताच सदर पुरुष कार्यकर्त्याने माफी मागितली व पळ काढला त्या सोबतच रेखाताई चौधरी यांनी देखील माफी मागितली.कार्यकर्त्याच्या वतींने झाल्या प्रकाराने संतप्त होऊन आम्ही सर्व सी आर पी ताईंनी आमच्या सी आर पी च्या संघटने कडून अनिल दादा पाटील यांना आमचा पठिंबा देण्याचे व निश्चित केले.
त्यानंतर चौधरी तिकडीने त्त्यांच्या एका वेबसाईट पत्रकातून ठराविक सी आर पी ताईंचे नाव घेत आम्ही महायुती शासनाच्या योजनाचा खोटा प्रचार करतो अशी बातमी प्रसिद्धी करत आमच्या नावे षडयंत्र रचले. त्या सर्व ताईंची मी लीडर आहे असे बातमी पत्रात छापुन आणले.
पण आम्ही सक्षम झालेल्या महिला आहोत आणि तुमच्या म्हणण्या प्रमाणे सर्व सी आरपीआय ताईंची लीडर म्हणून काही प्रश्न विचारतेय त्याची उत्तरं मला द्यावीत तीही प्रसिद्धी माध्यमातून असे आव्हान दिले आहे.

हे आहेत चौधरी बंधू व भगिनींना प्रश्न

पाच वर्षात कुठेही न चमकणारे झेप फौंडेशन एन निवडूकीत उद्योग मेळावे का घेते?,झेप फौंडेशन कर्ता -धर्ता रेखा ताई चौधरी या स्वतः एक स्त्री असताना बचतगट कार्यकर्तीना बदनाम कशा करू शकतात? आणि शिरीष दादा चौधरी यांना एक संधी अमळनेर तालुक्याने दिली तरी त्या कार्यकाळात एकही उद्योग का आणला नाही?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[democracy id="1"]