एनएमएमएस परीक्षेत डी.आर. कन्या शाळेचा झेंडा उंचावला; गुणवंत विद्यार्थिनींचा सत्कार

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

अमळनेर : येथील नामांकित खा.शि.मं. संचलित द्रौ.रा. कन्या शाळेच्या विद्यार्थिनींनी राष्ट्रीय स्तरावरील मानाच्या एनएमएमएस (NMMS) परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या परीक्षेत शाळेच्या एकूण सहा विद्यार्थिनींनी मेरिट यादीत स्थान पटकावत शाळेचा लौकिक वाढवला आहे.
यशस्वी विद्यार्थिनींमध्ये मोक्षदा भूषण पाटील, मयुरी संदीप पाटील, ऐश्वर्या अजय पाटील, रोहिणी बाळू शिरसाठ, वैष्णवी महारू पाटील व केतकी पंकज देशपांडे यांचा समावेश असून, त्यांच्या या यशाबद्दल शाळेत विशेष सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला.
यावेळी शालेय समितीचे चेअरमन भाऊसो जितेंद्रजी जैन यांच्या हस्ते विद्यार्थिनींना सन्मानचिन्ह व बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमास मुख्याध्यापिका सौ. एस. एस. सूर्यवंशी मॅडम, उपमुख्याध्यापिका श्रीमती एस. पी. बाविस्कर, पर्यवेक्षक श्री एस. पी. वाघ, ज्येष्ठ शिक्षक श्री एस. एस. माळी, श्री एस. एस. वाघ सर, ज्येष्ठ लिपिक श्री शाम पवार, श्री के. आर. बाविस्कर, श्रीमती आर. एस. सोनवणे तसेच परीक्षेच्या प्रमुख श्रीमती तरन्नुम शेख यांची उपस्थिती होती.
यावेळी सर्व शिक्षक-शिक्षिका, तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थिनींचे कौतुक करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. या यशामुळे शाळेचा शैक्षणिक दर्जा अधिक उंचावला असून, इतर विद्यार्थ्यांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.

Atkav News
Author: Atkav News

Leave a Comment

और पढ़ें