
पारोळा – आदर्श माध्यमिक विद्यालय, पारोळा येथे झालेल्या तालुकास्तरीय विज्ञान महोत्सवात पारोळा तालुक्यातील २२ शाळांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यात श्री संत सोमगिर माध्यमिक विद्यालय, भिलाली (संस्था – श्री स्वामी समर्थ शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळ, भादली खु.) येथील इ. ९ वीची विद्यार्थिनी कु. परिनीता रविंद्र पाटील हिने द्वितीय क्रमांक मिळवत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली.
तिच्या यशासाठी विज्ञान शिक्षक श्री विकास पाटील सर यांचे मार्गदर्शन लाभले. या कामगिरीबद्दल संस्थेचे चेअरमन अण्णासाहेब मनोज पाटील, गटशिक्षण अधिकारी नानासो विश्वासराव पाटील, मुख्याध्यापक श्री अविनाश पाटील तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.









