अमळनेर : आदिवासी ठाकूर समाजाच्या पारंपरिक शिमगा उत्सवाला यंदा महिलांनी होळी पेटवून नव्या पर्वाची सुरुवात केली. टाऊन हॉल येथील मैदानात ठाकूर समाजाने मोठ्या जल्लोषात होळी साजरी केली. परंपरेनुसार पुरुषवर्ग होळी पेटवत असताना, यंदा समाजातील महिलांनी पुढाकार घेत ही प्रथा सुरू केली.
महिलांच्या पुढाकाराने उत्सवात नवा बदल
यंदाच्या होळीच्या कार्यक्रमात महिलांनी होळी उभारण्यापासून ते होळी पेटवण्यापर्यंतचा संपूर्ण विधी पार पाडला. या ऐतिहासिक क्षणी महिला प्रमुख मिनाताई महाले, सचिव शैलजा शिंदे, कोषाध्यक्ष अपेक्षा पवार, उपाध्यक्ष रेखा ठाकूर, तसेच बेबीबाई वानखेडे, जयश्री वाघ, हिराबाई ठाकूर, हर्षदा वाघ, आशा ठाकूर, स्वाती ठाकूर, अश्विनी ठाकूर, मनिषा सूर्यवंशी, शितल ठाकूर, हेमलता ठाकूर, सुमन ठाकूर, मंगल ठाकूर, दुर्गाबाई ठाकूर, विजया सैदाने, रुपाली ठाकूर, दिपाली ठाकूर, कोकीळा ठाकूर, भाग्यश्री ठाकूर, स्वप्ना ठाकूर, पूनम ठाकूर, शारदा ठाकूर, मीराबाई ठाकूर, छायाबाई ठाकूर, उज्वला ठाकूर यांच्यासह अनेक महिला उपस्थित होत्या.
महिलांनी पारंपरिक पद्धतीने होळीची पूजा करून नारळाची ओटी वाहिली. होळी खड्ड्यात उंबर झाडाची फांदी उभी करून महिलांनीच होळी सजवली. झेंडू फुलांच्या माळा, रंगबिरंगी पताका व फुगे यांनी होळी सजवण्यात आली होती. समाज बांधव व भगिनींनी होळीच्या अग्नीभोवती फेर धरून “एकच चाले, आदिवासी चाले” या गाण्यावर आनंदोत्सव साजरा केला.
ठाकूर समाजाची पारंपरिक शिमगा परंपरा
आदिवासी ठाकूर समाजात पाच दिवस होळीचा मोठा सोहळा साजरा केला जातो. धुलीवंदन ते रंगपंचमीपर्यंत हा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडतो. यामध्ये होळी पेटवण्याचा विधी, आदिवासी गाणी, नृत्य आणि पारंपरिक विधी महत्त्वाचे मानले जातात.
समाजबांधवांचा मोठा सहभाग
यंदाच्या होळीच्या कार्यक्रमात जमातीचे प्रमुख दिलीप ठाकूर, राज्याचे सरचिटणीस आणि अर्बन बँकेचे व्हाईस चेअरमन रणजित शिंदे, प्रकाश वाघ, संजय ठाकूर, अनिल ठाकूर, यशवंत सूर्यवंशी, धनराज ठाकूर, चंद्रशेखर ठाकूर, रविंद्र वानखेडे, प्रकाश वानखेडे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. त्यांनी होळीला पुष्पहार अर्पण करून “होळी रे होळी पुरणाची पोळी” च्या पारंपरिक गजरात पूजन केले.
याशिवाय दिलीप वानखेडे, जितेंद्र ठाकूर, विजय ठाकूर, वामन ठाकूर, अरुण चव्हाण, कमलाकर ठाकूर, उमाकांत ठाकूर, राजेंद्र ठाकूर, ज्ञानेश्वर ठाकूर, सुरेश ठाकूर, हेमंत ठाकूर, लिलाधर ठाकूर, सुकदेव ठाकूर, काशिनाथ ठाकूर, गजानन ठाकूर, भैय्या ठाकूर, कुणाल ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते.
गोडवा वाढवणारे जिलबीचे वाटप
होळीच्या अग्नीजवळ पूजा झाल्यानंतर उपस्थितांना गुळाची जिलेबी प्रसादरूपाने वाटप करण्यात आली. आदिवासी ठाकूर समाज महिला मंडळातर्फे हा कार्यक्रम यशस्वी करण्यात आला.
बदलत्या काळात महिलांचा महत्त्वाचा सहभाग
परंपरेनुसार पुरुषवर्गाने साजरा करणाऱ्या या उत्सवात महिलांनी पुढे येऊन होळी पेटवण्याची सुरुवात केली. यामुळे समाजात महिलांचा सन्मान वाढवण्यास मदत होईल. बदलत्या काळासोबत आदिवासी परंपरा पुढे नेण्याच्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
— अटकाव न्यूज , अमळनेर —









