
अमळनेर: रोटरी क्लब अमळनेरतर्फे ROTARY YOUTH LEADERSHIP AWARDS (RYLA) ही युवकांसाठी विशेष कार्यशाळा दिनांक 8 जून 2025, रविवार रोजी रोटरी हॉल येथे यशस्वीरीत्या संपन्न झाली. या कार्यशाळेचे प्रमुख विषय होते “व्यक्तिमत्त्व विकास व जीवन शिक्षण”, ज्यावर मार्गदर्शन करण्यासाठी नाशिक येथील सुप्रसिद्ध प्रेरणादायक वक्ते प्रा. ललित खैरनार यांना आमंत्रित करण्यात आले होते.
या उपक्रमात अमळनेर येथील इयत्ता 10 वीच्या वर्गातील 135 विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. सहभाग पद्धतीने व बौद्धिक खेळांच्या माध्यमातून जीवनातील मूलभूत कौशल्ये व मूल्यांची शिकवण दिली गेली. विद्यार्थ्यांनी “कुछ पाने के लिए, कुछ ज्यादा करना पड़ता है” यासारख्या सकारात्मक संदेशांद्वारे स्वतःला प्रेरित केले.
कार्यशाळेतील एक विशेष उपक्रम म्हणजे STUDY BUDDY APP (मोबाईल अॅप्लिकेशन) चे वितरण. IDEAL STUDY Mumbai द्वारे तयार केलेल्या, 10 वीच्या अभ्यासक्रमावर आधारित या अॅपची बाजारमूल्य ₹1500/- असून, ते रोटरी क्लब अमळनेर व रोटरी डिस्ट्रिक्ट 3030 च्या संयुक्त प्रयत्नांतून केवळ ₹15/- मध्ये विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आले.
कार्यक्रमाचे उदघाटन श्री. प्रदीप अग्रवाल यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे रो. मितेश गोसलीया व रो. लालचंद सैनानी यांनी आपल्या भाषणांमधून जीवन शिक्षणाचे महत्त्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवले. सूत्रसंचालन रो. प्रतीक जैन यांनी उत्तमरित्या पार पाडले.
कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी विद्यार्थ्यांनी आपले अनुभव शेअर करत रोटरी क्लब अमळनेरचे मन:पूर्वक आभार मानले. रोटरी क्लबचे अध्यक्ष रो. ताहा बुकवाला यांनी सर्व सहभागी, पाहुणे व कार्यकर्त्यांचे आभार मानले.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी रो. विशाल शर्मा (सेक्रेटरी), रो. रोहित सिंघवी, व रो. अविनाश अमृतकर यांचे विशेष सहकार्य लाभले.
रोटरी क्लब अमळनेर मागील पाच वर्षांपासून सलगपणे RYLA कार्यशाळा घेत असून, युवकांचा सर्वांगीण विकास व समाजासाठी सुजाण नागरिक घडवण्याच्या उद्देशाने कार्यरत आहे.









