Search
Close this search box.

दैनिक देशोन्नतीच्या वार्षिक मिटींगमध्ये उत्कृष्ट प्रतिनिधींचा भव्य सत्कार

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

जळगाव (प्रतिनिधी) – येथील पद्मालय विश्रामगृहात नुकतीच दैनिक देशोन्नतीची वार्षिक मिटींग उत्साहात पार पडली. या मिटींगमध्ये जळगाव जिल्ह्यात संपादकीय व जाहिरात विभागात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प्रतिनिधी व वार्ताहरांचा भव्य सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक व प्रमुख अतिथी म्हणून ग्रुप प्रेसिडेंट तथा महाव्यवस्थापक उमेश सापधारे सर आणि आवृत्ती संपादक मनोज बारी यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमात निवडक प्रतिनिधींना गणरायाची आकर्षक मूर्ती, शाल व श्रीफळ देऊन गौरवण्यात आले. संपादकीय विभागात उल्लेखनीय कामगिरीसाठी एरंडोलचे तालुका प्रतिनिधी कमरअली सय्यद यांना प्रथम क्रमांक, अमळनेरचे शहर प्रतिनिधी विजय गाढे यांना द्वितीय क्रमांक तर ग्रामीण विभागातून पिंपळगाव हरेश्वरचे प्रतिनिधी किशोर लोहार यांना गौरवण्यात आले.

जाहिरात विभागात पाचोरा तालुका प्रतिनिधी शांताराम चौधरी यांना प्रथम क्रमांक, पारोळा तालुका प्रतिनिधी दिलीप सोनार यांना द्वितीय क्रमांक तर ग्रामीण भागातून पाळधीचे प्रतिनिधी गोपाळ सोनवणे यांनी आपले स्थान निश्चित केले.

या कार्यक्रमाला धुळे जिल्हा प्रतिनिधी दिनेश रावल, भुसावळ कार्यालय प्रमुख प्रेम परदेशी, जळगाव जाहिरात विभाग प्रमुख सुनील भावसार तसेच जळगाव व परिसरातील विविध तालुक्यांतून आलेले प्रतिनिधी व वार्ताहर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत शिस्तबद्ध व प्रेरणादायी पद्धतीने पार पडले. उपस्थित मान्यवरांनी प्रतिनिधींच्या कार्याची स्तुती करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. दैनिक देशोन्नतीच्या टीमने केलेल्या कार्याची आणि प्रतिनिधींनी दाखवलेल्या प्रामाणिकतेची ही सकारात्मक दखल उपस्थितांनी एकमुखाने मान्य केली.

Atkav News
Author: Atkav News

Leave a Comment

और पढ़ें