आईच्या अखेरच्या व्हिडिओ कॉल वर संवाद अन घडले धक्कादायक
अमळनेर अटकाव न्यूज : शहरातील इस्लामपुरा भागातील दोन एम बी बी एस चे विद्यार्थी रशिया येथील नोवगोरोड ्या नदीत वाहुन बेपत्ता झाले. ४ रोजी रात्री भारतीय वेळेनुसार सव्वा अकरा वाजेच्या सुमारास व रशिया येथील नऊ वाजेच्या सुमारास घटना घडली. जिशान अशपाक पिंजारी वय २० व त्याच्या आत्याची मुलगी जिया फिरोज पिंजारी वय २० दोन्ही रा इस्लामपुरा अमळनेर अशी वाहून गेलेल्या मुलांची नावे आहेत.
४ रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास जिशान , जिया आणि
इतर विदयाथी रशियात वोल्कोव्ह नदीच्या काठावरील पेडिस्टन पुलाजवळ चौपाटीवर फिरायला गेले होते. नेहमीप्रमाणे जिशान याने आपल्या आई शर्मीम ला क्हिडीओ कॉल केला. तेव्हा रात्रीचे सव्वा अकरा वाजले होते. जिया कशी नदीत गुडघाभर पाण्यात उतरली आहे हे आनंदाने तो आपल्या आईला दाखवत होता.
अन जणू काही त्याच्या आईला दुर्दवाचे संकेत प्राप्त झाले होते का काय ? लगेच शमीम यांनी जिशान याला सांगितले बेटा तू पाणी मे मत जा और जिया को भी बाहर निकाल और जलदी घरपे पहुचो ..आपल्या आईला त्याने सकारात्मक प्रतिसाद देत त्याने लगेच व्हाट्सअप वर संदेश टाकला की आम्ही घरी जातो.
अवघ्या १५ मिनिटात नदीला पूर आला अन क्षणात बघता
बघता जिशान ,जिया सह चार विदयार्थीं पुराच्या पाण्यात वाहुन गेले. गेल्या वर्षभरापूर्वी दोघे रशियाला रवाना झाले होते.