विद्यार्थिनींनी पुस्तके वाचनावर भर द्यावा डॉ. अपर्णा मुठे
अमळनेर: दिनांक २३ जुलै येथील डी . आर.कन्या शाळेचा ८०वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. दीप प्रज्वलन व फुगे हवेत सोडून कार्यक्रमाची सुरुवात आली. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले.शाळेच्या मुख्याध्यापिका एस.एस. सूर्यवंशी यांनी प्रस्तावना केली. मागील शैक्षणिक वर्षातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. शालेय फुलवात नामक हस्तलिखिताचे प्रकाशन डॉ.अपूर्णा मुठे यांनी केले. त्यावेळी संस्थेचे अध्यक्ष जितेंद्र झाबक,संस्थेचे आश्रयदाते विवेकानंद भांडारकर,अभिजीत भांडारकर,निलेश भांडारकर
कार्याध्यक्ष डॉ. संदेश गुजराथी, उपाध्यक्ष जितेंद्र देशमुख व माधुरी पाटील,विश्वस्त वसुंधरा लांडगे ,समन्वय समिती चेअरमन डॉ.अनिल शिंदे, डी शाळेचे चेअरमन निरज अग्रवाल,फार्मसी कॉलेजचे चेअरमन योगेश मुंदडे ज्येष्ठ संचालक हरीअण्णा वाणी, पी.बी.ए.इंग्लिश मीडियमचे चेअरमन प्रदीप अग्रवाल, चिटणीस डॉ. ए .बी.जैन, सहचिटणीस डॉ.धीरज वैष्णव,पालक संघाचे आधार पाटील,शिक्षक प्रतिनिधी व्ही. एम.पाटील व पराग पाटील, मुख्याध्यापक कैलास पाटील भारती आठवले,उपस्थित होते.शाळेची गुणवंत विद्यार्थीनी तनुजा पाटील हिने आपल्या मनोगतात शासकीय चित्रकला परीक्षेतील यशाने माझे एस.एस.
सी.चे मार्क वाढले. शिकविणारे सर्व शिक्षक शिक्षिका यांचे आभार मानले.फुलवात हस्तलिखित सूत्रसंचालन पी.पी.जोशी यांनी केले.
पर्यवेक्षिका एस.पी बाविस्कर यांनी डॉ.अपूर्ण मुठे यांचा परिचय करून दिला.आपल्या अध्यक्षीय मनोगतात डॉ.मुठे यांनी विद्यार्थिनींनी कलेत व क्रीडेत आपले कौशल्य दाखवावे.दोरी उड्या,रनिंग, मैदानी खेळ खेळावे. संचालकांनी शाळेसाठी मैदान उपलब्ध करून द्यावे. विद्यार्थिनींनी अवांतर वाचन वाढवावे व यशस्वी व्हावे असे सांगितले.मागील वर्षभरात गुणवंत,विविध ठिकाणी निवड झालेले, पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.त्यामध्ये शाळेच्या मुख्याध्यापिका एस एस सुर्यवंशी,कला व करुणा शिक्षक डी.एन.पालवे, क्रीडा शिक्षक जे.व्ही.बाविस्कर, उपक्रमशिल शिक्षिका एल . व्ही.घ्याऱ,पी.व्ही.साबे,
प्रेरणा सराफ, गाईड शिक्षीका वाय.एम. पाटील, एन.बी. बाविस्कर, जे.एस.भालेराव यांचा सत्कार करण्यात आला. शालेय गाईड विद्यार्थिनींचा राज्यपाल पुरस्कार प्राप्त झाला म्हणून सत्कार करण्यात आला. विविध समितींनी वर्धापन दिन यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले.सूत्रसंचालन पी.डी.शेवाळे यांनी तर आभार व्ही.एम.कदम यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेचे सर्व शिक्षक-शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी यांनी सहकार्य केले.