पुणे विभागातील शाळा आज 25 जुलै रोजी बंद

पुणे : ( अटकाव न्यूज) :  दिनांक 24 जुलै म्हणजेच काल रात्री पासूनच पुण्यात पावसाची सततधार सुरु आहे.भोर, वेळला, मावळ ,मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसर आणि पुणे शहरातील शाळा आज २५ जुलै रोजी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर सुहास दिवसे यांनी दिले आहेत.
पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांपैकी एक असलेले खडकवासला हे धरण हंगामात प्रथमच १०० टक्के भरले.
खडकवासला धरणातून ४० हजार क्यूसेक विसर्ग सुरू होत आहे. तसेच पुणे शहराच्या सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी दक्षता बाळगावी आणि आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.दिवसे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[democracy id="1"]