संपादकीय… श्री कुलस्वामिनी चामुंडा माता मंदिर अमळनेर

पुणे:  ( राजश्री सुदाम बडगुजर , विभागीय कार्यकारी संपादीका अटकाव न्यूज):   “प्रत्येक हींदू कुळांची कुलदेवता असते आणि प्रत्येकाने आपल्या कुलदेवतेचीसेवा,उपासना, नामजप ,मंत्र जप चांगल्या प्रकारे केला तर कुलदेवी आपल्या कुळाचा उद्धार करते तसेच वंशवृद्धी देखील करते आणि आपल्या जीवनाचे जे ध्येय आहे ते देखील पूर्ण होतात.असे शाश्वत सत्य अनुभवास येते. गुजर,बडगुजर, महाजन ( कांचमाळी), शिंगांणे(भोई) काही भावसार, मोची काठेवाडी अशा अनेक जातींची कुलस्वामिनी श्री चामुंडा माता आहे.
गुजरात येथील चोटीला पहाडावर कुलदेवी श्री चामुंडा माताजी स्वयंभू प्रकट झालेले आहे.तसेच जुनागढ येथे किल्ल्यात स्थापना केली आहे आणि आणि देवास( म.प्र.) येथे सुध्दा श्री चामुंडा मातेचे मंदिर आहे
चोटीला येथील स्वयंभू, जागृत कुलस्वामिनी चामुंडा मातेच्या दर्शनाला जीवनात एकदा तरी जाण्याची प्रत्येकाची इच्छा असते. लग्न कार्यप्रसंगी लग्नपत्रिका देवीच्या चरणी ठेवून, देवीला आमंत्रित केले जाते आणि शुभकार्य निर्विघ्न पार पाडण्यासाठी प्रार्थना ही केली जाते .लग्न झाल्यावर नवविवाहित जोडप्यास सुखी वैवाहिक जीवनाच्या आशीर्वादासाठी कुलस्वामिनी च्या दर्शनाला पाठवले जाते. पण प्रत्येकाला चोटीलाला जाणे शक्य नसल्याने महाराष्ट्रातील काहीबडगुजर समाजातील प्रतिष्ठित लोकांनी सर्वांच्या सोयीसाठी महाराष्ट्रात पहिल्यांदा कुलस्वामिनी चामुंडा मातेचे मंदिर उभारण्यास सुरुवात केली आणि आता महाराष्ट्रात आठ वेगवेगळ्या ठिकाणी कुलस्वामिनी चामुंडा मातेची मंदिरे आहेत .नववे अमळनेर येथील मंदिर लवकरच पूर्ण होणार आहे . त्याचप्रमाणे धुळे येथील आणि पिंपळकोठा येथील मंदिर देखील लवकरच पूर्ण होऊन भाविकांसाठी खुले करण्यात येणार आहेत. ज्या लोकांनी यात पुढाकार घेतला त्या सर्वांचे मनःपूर्वक आभार व श्री चामुंडा माता कुलदैवत असलेला समाज आपला सदैव ऋणी राहील यात शंकाच नाही.
अमळनेर, जळगाव जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका समजला जातो. अमळनेर हे शहर बोरी नदीच्या काठावर बसलेले असून प्रती पंढरपूर म्हणून ख्याती तीर्थक्षेत्र आहे. या ठिकाणी विठ्ठलाचे मंदिर असून संत सखाराम महाराज यांचीही पुण्य भूमी असून जग प्रसिद्ध होत असलेल्या मंगळग्रह देवस्थान भारतातील दोन पैकी हे एक आहे.तसेच पुज्य सानेगुरूजी यांची कर्मभूमी असलेल्या अमळनेर शहरात बडगुजर समाजाची 425 तर 450 कुटुंब वसलेले आहेत.

अशा या पुण्यनगरीत आपल्या कुलदेवतेचे मंदिर असावे असा विचार मा.श्री जगन्नाथ (बापू) शेनपडूशेठ बडगुजर यांच्या मनात आला.म्हणून काही लोकांना घेऊन हे मंदिर अस्तित्वात आणल्याचे दिसत आहे .


सुमारे 7000 ते 7500 चौरस फुट भुखंडात कुलस्वामिनी चामुंडा मातेचे मंदिर तयार करण्यात येत आहे.
लौकरच कुलस्वामिनी चामुंडा मातेचे मंदिर परिसरात नाविन्यपूर्ण आकर्षक असा बगीचा, त्यात जवळजवळ 15 ते 16 फूट उंचीचे झाडे आणि 500 लोक एकाच वेळेस बसतील अशी गोलराउंड व्यवस्था करण्यात येत आहे. मंदिराचे जवळ जवळ 80% टक्के काम पूर्ण झालेले आहे.
माननीय श्री जगन्नाथ बापूंचे खूप खूप धन्यवाद .असे सुंदर मंदिर आपण अंमळनेर येथील असहाय्य व अबालवृद्ध, श्रद्धाळू, भक्तगण या सर्वांसाठी तयार करून देत आहेत.

मातेची प्राणप्रतिष्ठेची तारीख देखील अमळनेर येथील अटकाव वृत्तपत्र समूहाचे मुख्य संपादक व बडगुजर समाज पंच मंडळ, व् चामुंडा माता मंदिर निर्माण समिती अमळनेर अध्यक्ष माननीय श्री बापूसाहेब जगन्नाथ शेनपडूशेठ बडगुजर यांनी लवकरात लवकर करावी.याची मातेच्या भक्तगणांना प्रतिक्षा लागली आहे.प्रत्येक गावात अनेक मंदिरे असतात, त्यात आपल्या कुलदेवीतेचे मंदिर झाले तर ते सोन्याहू पिवळे आहे. म्हणजे आपल्याला वर्षातून अनेकदा वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या कुलदेवतेचे दर्शन घेण्याच्या योग येऊ शकतो .मंदिराचे पावित्र्य राखणे आणि पूजा अर्चना देखील मंदिर झाल्यानंतर नियमित करणे हे तेवढेच महत्त्वाचे आहे.धन्यवाद.

.# बातमी माहिती संकलन.# सौ. राजश्री सुदाम बडगुजर,
कार्यकारी  संपादिका अटकाव न्युज  पुणे विभाग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[democracy id="1"]