अमळनेरात बोरी नदीपात्रातील संत सखाराम महाराज यात्रोत्सवात भाविकांच्या आनंदाला आले उधाण

मंत्री अनिल पाटील यांनी केली संत सखाराम महाराज यात्रोत्सवाची वारी

अमळनेर: खान्देशातील भाविकांचे श्रद्धास्थान प्रति पंढरपूर असलेल्या अमळनेरात बोरी नदीपात्रातील संत सखाराम महाराज यात्रोत्सवात भाविकांच्या आनंदाला उधाण आले आहे. खानदेश म्हणजेच धुळे, जळगाव, नंदुरबार येथील भाविकांची दर्शनासाठी गर्दी होत आहे. खान्देशातील हा सर्वात शेवटचा मोठा यात्रोत्सव असल्याने भाविक आवर्जून लालजींच्या दर्शनाचा लाभ घेतात यंदाही बोरी नदीचे पात्र खेळणी, खाद्यपदार्थांची दुकाने, पाळण्यांनी सजले आहे.
संध्याकाळी ते रात्री उशिरापर्यंत दररोज महाराष्ट्राच्या कान्याकोपरातून भाविकांची प्रचंड गर्दी उसळत असते ज्यामुळे यात्रेतील सर्व व्यावसायिक व विक्रेते चांगलेच आनंदीत आहेत दररोज लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. नदीपात्रात भाविकांची गर्दी असल्याने अक्षरशा दोन्ही पुलाकडे आपली वाहने पार्किंग करावी लागत आहे तसेच मोठे पाळणे, झुले, मौत का कुवा असे मनोरंजनाचे खेळ भाविकांना उत्साह आनत असतो. खाद्यपदार्थांची व थंडपेयाची दुकाने, मीना बाजार देखील हाउसफुल असून दररोजच्या उपयोगी वस्तू खरेदीसाठी देखील महिलांची गर्दी होत आहे. बालगोपालापासून ते वयोरूधानपर्यंत सर्व भाविक या खानदेशातील सर्वात शेवटच्या यात्रेच्या आनंद घेत असतात.

मंत्री अनिल पाटील यांनी केली संत सखाराम महाराज यात्रोत्सवाची वारी

यात्रेकरूंचा वाढविला उत्साह महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री  नामदार अनिल दादा पाटील यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह संत सखाराम महाराज यात्रोत्सवाची वारी करून यात्रेकरूंचा उत्साह वाढविला,यादरम्यान त्यांनी बालक मंडलीसोबत झुले,पाळणे व मौत का कुहा खेळास हजेरी लावून त्यांचा उत्साह द्विगुणित केला.यासोबतच काही रेस्टॉरंटमध्ये भेट देऊन यात्रेची प्रसिद्ध भजी, पाथरा, गोड शेव व जिलेबीवर ताव मारला. यावेळी अनेक महिला भगिनी,युवक व युवती आणि बालक मंडळीने त्यांच्यासोबत सेल्फी व फोटो काढलेत.मंत्री असूनही सामान्य यात्रेकृप्रमाणे त्यांनी यात्रोत्सवाची वारी केल्याने उपस्थित साऱ्यांनीच कौतुक केले.

संत सखाराम महाराज यात्रा,रथोत्सवात होमगार्ड यांना बंदोबस्त नाही, पोलिसांवर वाढला ताण ,
अनेक मोटरसायकली यात्रा उत्सवातून गेल्या चोरीस

पोलिसांच्या खांद्याला खांद्या लावून आपले कर्तव्य निभावणारे होमगार्ड यावर्षी संत सखाराम महाराज यात्रा उत्सवात ड्युटीला नसल्याने पोलिसांचा ताण वाढला आहे दरवर्षी होमगार्ड यांना यात्रा उत्सवात बंदोबस्त मिळत असतात पण यंदा यात्रा उत्सवात होमगार्ड यांना ड्युटी नाही चोरींचे प्रमाण यात्रा उत्सवात वाढत असून अनेक मोटर सायकल चोरीस गेल्या असून अपुऱ्या पोलीस कर्मचाऱ्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण पडतं असून होमगार्ड ड्युटीला असले की पोलिसांवरील काही प्रमाणात कामाच्या ताण कमी होत असतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[democracy id="1"]