मा. निवडणुक निरीक्षक (खर्च) श्री. कुमार चंदन (IRS) यांनी अमळनेर भेट
अमळनेर: दिनांक २०-०४-२०२४ रोजी ०३ जळगाव लोकसभा मतदार संघातर्गत ०१५ अमळनेर विधानसभा मतदार संघामध्ये मा. निवडणुक निरीक्षक (खर्च) श्री. कुमार चंदन (IRS) यांनी अमळनेर भेट देऊन निवडणुक खर्च विषयक पाहणाी केली. यात कंट्रोल रुम, खर्च पथक, एक खिडकी या ठिकाणी भेट देऊन कामकाजाचा आढावा घेतला. तसेच FST, VST, VVT आणि ACCOUNTING TEAM पथक प्रमुखांची बैठक घेऊन संबंधितांना कामकाजाच्या अनुषंगाने सुचना व मार्गदर्शन केले. यावेळी महादेव खेडकर, सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी 3 जळगाव लोकसभा मतदार संघ, १५ अमळनेर विधानसभा मतदार क्षेत्र, रुपेशकुमार सुराणा तहसिलदार अमळनेर, तुषार नेरकर मुख्याधिकारी नगरपरिषद अमळनेर, प्रशांत धमके निवडणूक नायब तहसिलदार, व उपरोक्त नमुद पथकातील पथक प्रमुख व इतर कर्मचारी उपस्थित होते.