मंत्री अनिल पाटील यांनी पाहणी करून घेतला कामाचा आढावा
अमळनेर: मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्या प्रयत्नाने निम्न तापी पाडळसरे धरणाच्या कामाचा एक एक टप्पा पुढे सरकत असुन पूर्वी पेक्षा धरणाचे चित्र आता पालटू लागले आहे,धरणावर नुकताच मंत्री पाटील यांच्या उपस्थितीतच मुख्य गेटचे गर्डर बसविण्याच्या कामास प्रारंभ करण्यात आला.
त्यांनी पाडळसरे धरणाची पाहणी करत कामाचा घेतला आढावा घेतला.जळगाव जिल्ह्यासह धुळे जिल्ह्यातील अनेक गावांसाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरणाऱ्या अमळनेर तालुक्यातील निम्न तापी प्रकल्प पाडळसरे धरणाचे काम जोमामे सुरू आहे.नुकतीच धरणाच्या चतुर्थ सुप्रमा ला राज्य शासनाकडून मान्यता मिळून आता केंद्रीय योजनेत समावेश होण्यासाठी फाईल दिल्ली दरबारी असताना इकडे सर्वात महत्वाचे काम म्हणजे धरणाला मुख्य गेट बसवायच्या कामाला प्रारंभ करण्यात आल्याने चैत्र नवरात्रोत्सवात हे शुभसंकेत मानले जात आहेत.गेटचे गर्डर बसवितांना मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी पाहणी केली तसेच धरणाच्या कामाचा आढावा घेतला. तसेच संबंधितांना सूचनाही त्यांनी केल्या.