श्री मंगळग्रह मंदिरात चैत्र नवरात्रोत्सवानिमित्त अष्टमी हवन पूजन

अमळनेर : येथील ख्यातनाम श्री मंगळग्रह मंदिरात दरवर्षीप्रमाणे चैत्र नवरात्रोत्सवानिमित्त अष्टमी हवन पूजेचे आयोजन करण्यात आले. मंगरूळ (ता. अमळनेर) येथील शिक्षक राजेंद्र श्रीराम पाटील हे सपत्नीक पूजेचे मानकरी होते.

हिंदू शास्त्राप्रमाणे नववर्षाची सुरूवात चैत्र मासापासून होत असते. त्यात चैत्र महिन्याच्या नवरात्रीला विशेष महत्त्व असते. त्याचे औचित्य साधून मंगळवार, १६ रोजी विधिवत अष्टमी हवन पूजन करण्यात आले.
यावेळी गणपती पुण्यावाचन, गौर्यादि मातृकापूजन, सर्वतोभद्र मंडल पूजन, सूर्यादि नवग्रह पूजन तसेच ईशान्य रुद्र पूजन करण्यात आले. त्यानिमित्त श्री भूमीमातेच्या प्रतिमेची आकर्षक पद्धतीने सजावट करण्यात आली होती. त्यामुळे मंदिर परिसरात भक्तिमय व चैतन्यमय वातावरण निर्माण झाले होते.
मंदिराचे पुरोहित प्रसाद भंडारी आणि जयेंद्र वैद्य यांनी पौरोहित्य केले. यावेळी मंगळग्रह सेवा संस्थेचे उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव एस. बी. बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम, खजिनदार गिरीश कुलकर्णी, विश्वस्त अनिल अहिरराव, सेवेकरी प्रकाश मेखा यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[democracy id="1"]