निसर्गाने विविधता दिली, पण आपण विषमता निर्माण केली…दर्शनाताई पवार

अमळनेर: शिक्षण प्रसारक मंडळाच्या, सानेगुरुजी विद्या मंदिर, नुतन माध्यमिक, कन्या हायस्कूल मधील विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनात स्री,पुरुष समानतेच्या विचारांचा प्रभाव पडावा यासाठी संस्थेच्या वतीने शिक्षक, शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे लिंग समानता (जेंडर इक्वालिटी) या विषयी एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. प्रथमतः कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. विचार मंचावर संस्थेचे माजी.अध्यक्ष गुणवंतराव पाटील, संस्थेचे सचिव मा.संदिप घोरपडे ,अध्यक्ष मा.हेमकांत पाटील, प्रमुख मार्गदर्शक मा.प्रा.संदिप गिरासे, सामाजिक कार्यकर्त्या ,माईंड पार्लर च्या संचालिका दर्शनाताई पवार, संस्थेचे संचालक, मा.अँड अशोक बाविस्कर, मा.किरण पाटील, मुख्खाध्यापक, श्रीमती अनिता बोरसे, मुख्खा.सुनील पाटील, मुख्खा संजीव पाटील. उपस्थित होते. आपल्या मनोगतात मा.संदिप घोरपडे यांनी मुलांवर स्री- पुरुष समानता,धर्मनिरपेक्षता, भारतीय संविधानाचे,संस्कार व्हावे आणि ते संस्कार विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण घेतांना सोप्या पद्धतीने शिक्षकांनी समजावून सांगावी यासाठी या कार्यशाळेचे आयोजन केले आहे असे नमूद केले.विद्यार्थ्यांना मोबाईल, टिव्ही यामुळे असे संस्कार समाजात मिळत नाही यासाठी हि सर्व खटाटोप. मानवी जीवनात स्रीयांचा हिस्सा बरोबरीने आहे,विद्यार्थ्यांना आपल्या मार्फत नवयुग दाखवणे हे उद्दिष्ट असुन त्यांच्या जिवनात कुसंस्कारातुन, सुसंस्कार घडावेत असा संदेश दिला. मार्गदर्शन करतांना दर्शनाताई पवार यांनी सांगितले की स्री- पुरुष समानते बद्दल बोलणे म्हणजे न्यायाच्या बाजूने बोलणे हे नमूद केले. व्यक्ती गत जिवनात आपण आपल्या गरजेनुसार बदल करतो, स्री- पुरुष यांच्या वैयक्तिक गरजा समान असु शकतात असे पटवून दिले. आपल्याला निसर्गाने विविधता दिली त्यावर आपण विषमतेने मात केली. नियमितपणे सरावाने स्री - पुरुष यांची दैनंदिन जीवनातील कामाची विभागणी झाली. हे विविध उदाहरण देऊन आपण आजच्या प्रक्षिणार्थी म्हणून शिक्षणाचा माध्यमातून विद्यार्थ्यांना पटवून द्या असे ठामपणे सांगितले. यानंतर मा.प्रा.संदिप गिरासे यांनी सामाजिक लिंगभेद आणि नैसर्गिक लिंगभेद या विषयावर माहिती दिली. कार्यशाळेत गटचर्चा करण्यात आली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती अनिता बोरसे यांनी केले,सुत्रसंचालन मा.जे.एस.पाटील यांनी केले. आभार प्रदर्शन मा. देवेंद्र पाटील यांनी केले. कार्यशाळेत संस्थेच्या सर्व शिक्षक, शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहभाग घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[democracy id="1"]